बॉलिवूडमधील उत्कृष्ट अभिनेत्री तब्बू हिने तिच्या अभिनयाने सर्वत्र तिचे नाव कमावले आहे. ‘चांदणी बार’ पासून ते ‘मकबूल’ आणि ‘हैदर’ या चित्रपटात तिने काम केले आहे. तिच्या अभिनयाचे केवळ भारतात नाही तर परदेशात देखील चाहते आहेत. तिने तिच्या मेहनतीने आणि कष्टाने इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख बनवली आहे. तब्बू शनिवारी(4 नोव्हेंबर) तिचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी…
तब्बूचा जन्म 4 नोव्हेंबर 1970 साली हैदराबाद येथे झाला. तिचे खरे नाव तबस्सुम हाशमी हे आहे. ती लहान असतानाच तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. अनेकांना ही गोष्ट माहित नसेल की, तब्बूची मोठी बहीण फराह 80-90 दशकात इंडस्ट्रीमधील एक सुंदर अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. तब्बूचे नाव अशा अभिनेत्रींच्या यादीत सामील आहे, ज्यांनी जेवढे चित्रपट केलेत तेवढे सुपरहिट झालेत. (Birthday special: let’s know some unknown facts about tabu’s life)
तिने अनेक वेगवेगळे विषय असणाऱ्या चित्रपटात काम करून रसिकांचे मन जिंकले. सुरुवातीपासूनच तिचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तब्बू नेहमी तिच्या काही वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत राहिली तर कधी इतर कोणत्यातरी कारणामुळे चर्चेत आली. माध्यमातील वृत्तानुसार तिच्यासोबत एकदा अशी एक घटना घडली होती, ज्यामुळे ती खूप घाबरली होती.
तब्बूची बहिण फराह आणि जॅकी श्रॉफ ‘दिलजला’ या चित्रपटाची शूटिंग करत होते. तेव्हा तब्बू देखील तिच्या बहिणीसोबत कधी कधी सेटवर जात असायची. या चित्रपटात डेनी खलनायकाच्या भूमिकेत होता. त्याला अशी सवय होती की, तो नेहमीच चित्रपटानंतर त्याच्या घरी पार्टी ठेवत असे. एक दिवस फराह त्याच्या घरी पार्टीला जाताना तब्बूला तिच्यासोबत घेऊन गेली. तिथे या चित्रपटाचे हिरो जॅकी श्रॉफ देखील उपस्थित होते.
माध्यामातील वृत्तानुसार दारूच्या नशेत जॅकी यांनी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. तेवढ्यातच डेनी तिथे आले आणि त्याने जॅकी यांना बाजूला केले. या गोष्टीची माहिती स्वतः फराहने दिली होती. ही बातमी ऐकून सगळेच हैराण झाले होते. तब्बू पुढे खूप मोठी अभिनेत्री झाली परंतु तिने कधीही जॅकी श्रॉफसोबत काम केले नाही. एवढंच काय तर कोणत्या पुरस्कार सोहळ्यात जरी त्यांचा सामना झाला तरी ते दोघे एकमेकांशी बोलत नाही.
तब्बूने ‘दृष्यम’, ‘दे दे प्यार दे’, ‘हवा’, ‘गोलमाल अगेन’, ‘भुल भुलय्या 2’, ‘हम साथ साथ है’, ‘हैदर’, ‘जवानी जानेमन’, ‘जय हो’, ‘हेरा फेरी’, ‘विजयपथ’, ‘फितूर’, ‘मिसिंग’, ‘हकीकत’, ‘जित’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
हेही नक्की वाचा-
–FIRनंतर एल्विश यादवची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘ओपन चँलेंज करतो जर मी…’
–कोण जिंकणार वर्ल्ड कप? विवेक ओबेरॉयने टीम इंडियाबद्दल केले मोठे भाकीत; म्हणाले…