मनोरंजनविश्वात मागील काही काळापासून नुसते आनंदाचे वारे वाहत आहे. इथे कुणाचे लग्न ठरत आहे, तर काही रिलेशनशिप जगासमोर येत आहेत. तर, काहींच्या घरी नव्या पाहुण्यांचे आगमन झालेले दिसत आहे. टेलिव्हिजन आणि चित्रपट दोन्ही माध्यमांमधून कोणत्या ना कोणत्या आनंदाच्या बातम्या सतत येत आहेत. आता या आनंदाच्या बातम्यांमध्ये अजून एका बातमीची भर पडली आहे. आणि ती म्हणजे अभिनेता आयुष्य वीज लग्नाच्या बेडीत अडकला आहे.
टेलिव्हिजन क्षेत्रातील अतिशय गाजलेल्या आणि प्रसिद्ध असणाऱ्या ‘ये रिश्ता क्या कहलाता हैं’ मालिकेत मोहित ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या मोहितने ३१ ऑक्टोबर रोजी साक्षी कोहलीसोबत लग्न केले. या लगांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आयुषची बहीण असणाऱ्या आरियाने या लग्नाचे काही फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहे. या फोटोंवर अभिनेत्री हिना खानने कमेंट करत आयुषला त्याच्या नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. आयुषच्या लग्नाला टेलिव्हिजन विश्वातील अनेक मंडळी हजर होती.
या फोटोंमध्ये आपण पाहिले तर आयुष आणि साक्षी यांनी पेस्टल रंगाच्या शेडमधील आऊटफिट घातले आहे. आयुषने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि गुलाबी रंगाचा फेटा बांधला आहे, तर साक्षीने गुलाबी आणि गोल्डन रंगाचा लेहेंगा आणि कुंदनचे दागिने घातले आहे. त्यांचा हा लूक खूपच सुंदर असून त्यात ही दोघे देखील अतिशय आकर्षक दिसत आहे. त्यांच्या या फोटोंवर हिना खानचा बॉयफ्रेंड असलेल्या रॉकी जयस्वालने देखील कमेंटकरून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनयासोबतच आयुष प्रोडक्शनमध्ये देखील सक्रिय आहे. त्याने कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक असणाऱ्या रेमो डिसुझासोबत ‘स्ट्रीट डान्सर’ आणि ‘रेस ३’ मध्ये काम केले आहे. आयुषने ये रिश्ता क्या कहलाता हैं मालिकेत नैतिकची बहीण असणाऱ्या नंदिनीच्या नवऱ्याची मोहितच्या भूमिका साकारली होती. याचवर्षी आयुषने जानेवारीमध्ये त्याचा साखरपुडा झाल्याची माहिती इंस्टाग्रामवरून दिली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–तब्बूला पाहून जेव्हा ‘या’ अभिनेत्याचा सुटला स्वतःवरचा ताबा, आजही तिच्या आठवणीत आहे ‘तो’ किस्सा
–तर ‘अशा’ पद्धतीने घातली विकी कौशलने कॅटरिना कैफला लग्नाची मागणी
–लग्नानंतर साजऱ्या होणाऱ्या पहिल्या दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीने केली खास तयारी शेअर केला व्हिडिओ