आज (५ नोव्हेंबर) दिवाळीतील तिसरा दिवस आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक असणाऱ्या पाडव्याचा दिवस. या दिवशी पत्नी त्यांच्या पतीचे औक्षण करतात. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार यावर्षी विवाह बंधनात अडकले आहेत. त्यामुळे अनेकांची ही पहिली दिवाळी आणि पहिलाच पाडवा आहे. यावेळी अनेकजण त्यांच्या पाडाव्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सोशल मीडियावर तिचा पती कुणाल बेनोडकर त्यांच्या पहिल्या पाडव्याचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकता की, सोनालीने आकाशी रंगाची साडी आणि स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच तिच्या पतीने देखील आकाशी रंगाचा कुर्ता घातला आहे. हे फोटो शेअर करून तिने “पाडवा पहाट” असे कॅप्शन दिले आहे. (Marathi actress give padava special photo on social media)
अभिनेत्री सई लोकूर ही देखील याच वर्षी विवाह बंधनात अडकली आहे. तिची देखील ही पहिली दिवाळी आहे. तिने पतीचे औक्षण करताना एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच दिवाळी पाडव्याला तिच्या पतीने तिला ईअरिंग गिफ्ट दिले आहेत. तसेच तिने तिच्या पतीसाठी एक उखाणा देखील घेतला आहे. ती उखाणा घेते की, “पाडवा आहे पती पत्नीच्या सण, दीपचे नाव घेते ऐका सगळेजण.”
बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत हिने देखील तिच्या पतीसोबत काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. तसेच तिच्या पतीने देखील पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.
मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे देखील याच वर्षी लग्न बंधनात अडकले आहे. त्यांनी देखील त्यांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये मितालीने हिरव्या रंगाची साडी तर सिद्धार्थने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे.
प्रिया मराठे आणि शंतनू मोघे यांनी देखील दिवाळी पाडवा साजरा केला आहे. त्यांनी देखील त्यांचे फोटो शेअर केले आहेत. त्या दोघांनी पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केला आहे. प्रियाने सुंदर साडी घातली आहे तर शंतनूने कुर्ता घातला आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर हिने देखील तिच्या पतीसोबत फोटो शेअर केला आहे. या फोटो मध्ये आपण पाहू शकतो की, तिने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. तर तिच्या पतीने देखील लाल रंगाचा कुर्ता घातला आहे. ते दोघेही खूप सुंदर दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा
-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो
-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा