Saturday, March 7, 2026
Home अन्य खूपच वाईट! ब्राझिलियन गायिकेचा विमान अपघातात झाला मृत्यू, अपघातापूर्वी शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

खूपच वाईट! ब्राझिलियन गायिकेचा विमान अपघातात झाला मृत्यू, अपघातापूर्वी शेअर केला ‘हा’ व्हिडिओ

ब्राझिलियन कंट्री म्युझिकमधील सर्वात लोकप्रिय तरुण स्टारपैकी एक असलेल्या मारिलिया मेंडोन्काचे शुक्रवारी (६ नोव्हेंबर) विमान अपघातात निधन झाले. त्या विमानात तिचे काका, मॅनेजर आणि सहकारीही होते, ज्यांचा या अपघातात जीव गेला. मारिलिया २६ वर्षांची होती. तिच्या मृत्यूची माहिती देताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना मिनास गेराइस राज्यात घडली आहे. हा अपघात कसा झाला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मारिलियाच्या प्रेस ऑफिसने एका निवेदनात म्हटले आहे की, तिचे निर्माता हेन्रिक रिबेरो, सहकारी अबिसिएली सिल्वेरा डायस फिल्हो तसेच विमानाचा पायलट आणि सह-पायलट दोघेही अपघातात ठार झाले.

मारिलियाने २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट अल्बम ‘सर्टेनजो’ द्वारे आपला ठसा उमटवला. या अल्बमसाठी तिला ग्रॅमी पुरस्कार मिळाला. मारिलिया केवळ ब्राझीलमध्येच नाही, तर विविध देशांमध्ये प्रसिद्ध होती. तिला यूट्यूबवर सुमारे २ कोटींपेक्षा अधिक लोकांनी फॉलो केले होते. तिने विमान अपघातापूर्वीचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, विमान मध्य पश्चिमेकडील गोयानिया शहरातून कॅरिंगा येथे जात होते. जेथे २६ वर्षीय मारिलियाने शुक्रवारी नंतर एक मैफिल केली. कारिंगा येथील ग्रामीण भागात हा अपघात झाला. या वृत्तात म्हटले आहे की, अधिकारी विमान अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी ट्वीट करून मारिलियाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विटरवर लिहिले की, “संपूर्ण देशाला या बातमीने धक्का बसला आहे, मेंडोन्का त्यांच्या पिढीतील महान कलाकारांपैकी एक होती. आपण आपल्या जवळचे काहीतरी गमावले आहे असे वाटते.”

मारिलियाने २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट अल्बम सर्टेनजो म्हणून ग्रॅमी पुरस्कार जिंकला. मारिलिया केवळ ब्राझीलमध्येच नव्हे, तर देशाबाहेरही अत्यंत लोकप्रिय होती. यासोबतच स्‍पॉटीफाईवर दर महिन्याला ८० लाखांहून अधिक लोक तिची गाणी ऐकत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा