‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात खूप राडे झाले आहेत. ‘डब्बा गुल’ या साप्ताहिक कार्यात स्पर्धकांनी खूप भांडण केली आहेत. स्पर्धेमध्ये नेहमी प्रमाणेच जय आणि विशालमध्ये आक्रमकता दिसून आली. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन खेळा ही गोष्टी बिग बॉसने वारंवार सांगून देखील या नियमांचे उल्लंघन झाले आहे. दिवाळी निमित्त ठेवण्यात आलेल्या या साप्ताहिक कार्यात घरातील सदस्यांनी नीट सहभाग घेतला नाही.
‘डब्बा गुल’ या कार्यात समोरच्या टीमचे बॉक्स लपवायचे असतात. यावेळी जय आणि विशालमध्ये हातापायी होते. तसेच उत्कर्ष आणि विकास देखील यात येतात. तेव्हा बिग बॉसने कार्य थांबवले. यानंतर त्या चौघांना दंड स्वरूप कार्यातून बाद केले. त्यामुळे नंतर टीममधील इतर सदस्यांनी हा खेळ खेळला. यानंतर जय आणि विशालमध्ये भांडण झाले. (Bigg Boss Marathi 3 : users angry on jay about quarrel between jay and Vishal)
जय विशालला म्हणतो, “तुझी लायकी नाहीये माझ्यासोबत बोलायची. तुझं वागणंचं वाईट आहे.” त्यावर विशाल म्हणतो, “तू हरलाय हे मान्य करायला शिक.” त्यानंतर जय उत्कर्षला म्हणतो की, हे भांडण जर बिग बॉसच्या घराबाहेर झालं असतं तर त्याने विशालला लोळवलं असतं. विशाल आणि जयच्या भांडणावर युजर्स प्रचंड भडकले आहेत. ते जयच्या वागण्याचा निषेध करत आहेत. विशालचा बाहेर जगात खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे या खेळात त्याला खूप जणांचा पाठिंबा आहे. त्याचे चाहते जयवर नाराजी व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावर विशालचे चाहते “विशाल निकम कोण आहे आणि त्याची काय लायकी आहे, हे जयला बाहेर आल्यावर समजेल” असे म्हणत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “जय दुधाणे नक्की माणूसच आहे ना? किती हिंसक खेळतो तो.” दुसऱ्या युजरने लिहिलं, “जयवर कारवाई झाली पाहिजे. जय शिवीगाळ करतो हे बिग बॉसना कसं चालतं?’ तर आणखी एका युझरने लिहिलं, “जय स्वतःला खूप ग्रेट समजतो. जयसारखा चिडका आणि रडका स्पर्धक कधीही पाहिला नव्हता. त्याला त्याच्या बॉडीचा खूप गर्व आहे. तो इतरांना देखील त्यांच्या शरीरावरून बोलतो. दुसऱ्यांची लायकी काढणारा हा कोण आहे?”
अशाप्रकारे ते जयच्या वागण्याचा निषेध करून विशालला पाठिंबा देत आहेत. या आठवड्यात जय आणि विशाल दोघेही नॉमिनेट आहेत. त्यामुळे आता त्या दोघांपैकी कोण घराबाहेर जाईल का? हे पाहणे महत्वाचे आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?
-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो