Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होताच, तो चित्रपटगृहात राडाच घालत असतो. त्याचे आजपर्यंतचे बहुतांश चित्रपट सुपरहिट झाले आहेत. नुकताच आता अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून, तो धमाल करत आहे. चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्यांदाच एखाद्याच चित्रपटाबद्दल एवढी चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहांची धमाल पुन्हा एकदा वाढली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कॅटरिना कैफची दमदार जोडी आहे. चला तर मग जाणून घेऊया चित्रपटाचे पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिस कलेक्शन कसे होते.

अक्षयचा ‘सूर्यवंशी’ आंतरराष्ट्रीय स्तरावर ६६ देशांमध्ये १३०० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. या देशांमध्ये उत्तर अमेरिका, यूएई, ऑस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या इतर अनेक देशांचा समावेश आहे. हा एक विक्रम आहे. ‘सूर्यवंशी’ भारतात ४ हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे. यासाठी, निर्मात्यांनी देशातील तीन प्रमुख मल्टिप्लेक्स – पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपॉलिससह रिवेन्यू शेअरींग डीलनंतर चित्रपट प्रदर्शित केला आहे.

‘सूर्यवंशी’च्या पहिल्या दिवसाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्याच दिवशी हा चित्रपट २६-२७ कोटी रुपये कमवेल असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, ‘सूर्यवंशी’ने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श ‘सूर्यवंशी’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर म्हणाले, “ही चांगली सुरुवात आहे. चित्रपट व्यवसायाचा मोठा भाग असलेल्या महाराष्ट्रात अजूनही ५० टक्के ऑक्यूसपेंसी लागू आहे. या राज्यातून चित्रपट उद्योगाला ३५-४० टक्के व्यवसाय मिळतो. त्याचवेळी कोमल नाहटा सांगतात की, महाराष्ट्र, गोवा, बिहार, झारखंड आणि हरियाणामध्ये अजूनही ५० टक्के सेटिंगची क्षमता आहे.

‘सूर्यवंशी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिम्बा’ नंतर हा चित्रपट तिसरा कॉप युनिव्हर्स इन्स्टॉलमेंट आहे. ‘सूर्यवंशी’ ऍक्शन, रोमान्स, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने परिपूर्ण आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचाही मोठा कॅमिओ आहे. जे प्रेक्षकांना पूर्ण मनोरंजन देतो. अक्षय अजय आणि रणवीरसोबत ऍक्शन करताना दिसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

-‘दिल तो पागल है’ला २४ वर्षे पुर्ण: कोणाचीही हिंमत नसताना, माधुरीला टक्कर देण्यास तयार झाली होती करिश्मा

-करीनाचा चिमुकला जेह दिसला आत्या सबाच्या मांडीवर खेळताना; पाहा ‘हा’ गोंडस फोटो

हे देखील वाचा