Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘भगवान के नाम पे मुझे कॅप्टन बना दो’, कॅप्टन्सी टास्कवरून मांजरेकरांनी घरातील सदस्यांना सुनावले खडेबोल

‘बिग बॉस मराठी’च्या घरात दिवाळीचा आठवडा मस्त गेला आहे. बाहेरील जगात फटाके वाजत होते. परंतु इथे घरातील सदस्यांमध्येच फटाके वाजत होते. घरात राडे, भांडण, गैरसमज, रुसवे-फुगवे या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आहेत. नॉमिनेशन टास्कपासून ते अगदी कॅप्टन्सी टास्कपर्यंत या गोष्टी कायम राहिल्या होत्या. त्यामुळे सदस्यांची चीडचीड झाली आणि त्यांना राग अनावर झाला. साप्ताहिक कार्यात तर बिग बॉसने जय, विशाल, उत्कर्ष आणि विकास यांना कार्यातून बाद केले होते. त्यांना राग अनावर झाल्याने टास्क दरम्यान धक्का बुक्की झाली.

परंतु या वीकेंडला मांजरेकरांनी सगळ्यांचा हिशोब केला आहे. ज्यांनी या आठवड्यात चुकीची वर्तवणूक केली त्यांना चांगलेच खडेबोल सुनावले आहे. तसेच टास्कशिवाय तुम्ही माणूस म्हणून पण चांगले आहात हे लोकांना दिसुद्या, असे सांगितले. तसेच जयवर त्यांनी खूप नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, “जर माझ्या हातात असतं, तर मी सगळ्यात आधी जयला घरा बाहेर काढलं असतं.” त्यानंतर त्यांनी बाकी स्पर्धकांना देखील चांगलेच झापले. (Bigg Boss Marathi 3 : mahesh Manjrekar scold on contestant about captain task)

यानंतर ते सोनालीला म्हणातात की, “सोनाली तुला नक्की काय म्हणायचं असतं ते कळतच नाही. तुझा मुद्दा काय आहे ते आम्हाला कळतच नाही. तू आपली येते आणि बोलतच राहते. पण कोणालाही काहीच समजत नाही, जर तुम्हाला दुसऱ्या ग्रुपमध्ये जायचं आहे, तर जा नाहीतर इंडिपेंडंट खेळा. कोण अडवतं का तुम्हाला?” यानंतर ते म्हणतात की, “या घरात एकच माणूस दिसतो, मला ज्याला कॅप्टन्सीची काही पडलेली नाही तो म्हणजे विशाल. तो कधीच म्हणत नाही की, मला कॅप्टन बनायचं आहे किंवा कॅप्टन्सी साठी झगडतोय.”

यानंतर ते म्हणतात की, “बाकी सगळे आपले ते करोटा घेऊन फिरत असतात. भगवान के नाम पे कोई मुझे कॅप्टन बना दो. मला वाचव मग तू मी अशी आहे आणि तशी आहे.” तसेच ते म्हणतात की, “कॅप्टन झाल्यावर असा काय फरक पडतो, फक्त कॅप्टन रूम मिळते या पलीकडे काय मिळते? ”

त्यांच्या या बोलण्यानंतर घरातील सदस्य नाराज होतात. कोणीही त्यांच्यासमोर काहीही बोलत नाही केवळ शांत बसून सगळं काही ऐकत असतात. तसेच या आठवड्यात मीनल आणि विशाल सुरक्षित झाले आहे. पुढील आठवड्यात सोनाली, जय आणि तृप्तीपैकी कोणीतरी एक घराबाहेर जाणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हिरव्या रंगाच्या साडीमध्ये कातिल अदा दाखवताना दिसली जान्हवी कपूर

-काळजात घंटी वाजावी असे फोटो शेअर करत जान्हवीने खास अंदाजात चाहत्यांना म्हटले ‘हॅपी दिवाळी’

-स्वतःला फिट ठेवण्यासाठी जान्हवी घेतेय मोठी मेहनत, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल फिदा

हे देखील वाचा