बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर-चित्रपट निर्माती फराह खान आणि कोरिओग्राफर गीता कपूरचे सुंदर नाते कोणापासूनही लपलेले नाही. दोघींच्या वयात फारसा फरक नाही, पण असे असतानाही गीता फराहला माँ म्हणते आणि अनेकदा तिचे कौतुक करताना दिसली आहे. इतकेच नाही, तर फराहनेही गीतावर नेहमीच मुलीसारखे प्रेम केले आहे. नुकताच फराह खानच्या ‘झी कॉमेडी शो’चा ग्रँड फिनाले झाला, ज्यामध्ये गीता कपूर पाहुणी म्हणून पोहोचली होती. इथे दोघींनी खूप धमाल केली.
या शोमध्ये फराहने गीताचे जोरदार कौतुक केले, तर दुसरीकडे गीताने सांगितले की, ती फराहला माँ का म्हणते. मात्र, यादरम्यान गीताने फराहला माँ म्हटल्यामुळे विमानतळावर तिचा अपमान करण्यात आल्याची घटना आठवली. एवढेच नाही, तर एअर होस्टेसने तिला अडवले.
गीता शोमध्ये म्हणाली की, “जेव्हा मी कोणत्याही कामासाठी, शूटिंगसाठी किंवा कार्यक्रमासाठी जायचे, तेव्हा माझी आई माझ्यासोबत फिरत असे. मात्र, जेव्हा मी तिच्यासोबत (फराह खान) काम करायला सुरुवात केली, तेव्हा आम्हाला खूप परदेशी प्रवास करावा लागला. त्याकाळात माझी आई माझ्यासोबत प्रवास करू शकली नाही, पण फराहने माझी आईप्रमाणे काळजी घेतली आणि मला तिच्याकडून आईचे प्रेम आणि संरक्षण वाटले, तेव्हापासून मी तिला मनापासून ‘मम्मा’ म्हणू लागले.”
गीताच्या या बोलण्यानंतर फराहने तिला अपमानाचा सामना करावा लागल्याची घटना सांगितली. फराह म्हणाली की, “एकदा आम्ही विमानतळावर होतो. यावेळी मी डेनिम शॉट्स आणि टॉप घातला होता, त्या आऊटफिटमध्ये मी खूप सुंदर दिसत होते. तेवढ्यात गीता मागून ‘मम्मी मम्मी…’ ओरडत आली, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.”
पुढे फराह म्हणाली की, “गीताचे बोलणे ऐकून एअर होस्टेसही आश्चर्यचकित झाल्या. त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, तू एवढी यंग असताना तू एवढ्या मोठ्या स्त्रीची आई कशी होऊ शकतेस? ते खूप लाजिरवाणे होते.” फराहने तिचे बोलणे चालू ठेवले आणि सांगितले की, गीता तिच्या मुलीसारखी आहे आणि ती नेहमी सुंदर गोष्टी शेअर करते, जे कायम तसेच राहतील.
गीता कपूरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फराह खानसोबत केली होती. तिने फराह खानला ‘मोहब्बतें’, ‘कुछ कुछ होता है’, ‘कल हो ना हो’, ‘ओम शांती ओम’ यांसारख्या चित्रपटांसह अनेक चित्रपटांमध्ये असिस्ट केले आहे.(when farah khan was insulted at the airport for calling geeta kapur mummy)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
अरे बापरे! फराह खान होती करण जोहरच्या प्रेमात, तांत्रिक अडचण सांगत ‘त्याने’ नाकारला प्रस्ताव
केआरकेची बॉलिवूड चित्रपटांसाठी अनोखा नियम बनवण्याचे मागणी; म्हणाला, ’80 टक्के नफा सरकारकडे…’