Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मुलगा अभिमन्युच्या ‘तितर-बितर’ गाण्यावर डान्स करणाऱ्या भाग्यश्रीच्या एक्सप्रेशन्सने जिंकले नेटकऱ्यांचे मनं

सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी कलाकार त्यांचे विविध व्हिडिओ शेअर करत असतात. जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे. काही कलाकार भलेही चित्रपटांमध्ये सक्रिय नसले तरी सोशल मीडियावर सक्रिय आहेत. याच यादीतले एक नाव म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री. १९८९ साली सलमान खानसोबत ‘मैने प्यार किया’ सिनेमातून यशस्वी पदार्पण करणारी भाग्यश्री आजही सर्वांच्या लक्षात आहे. या सिनेमातून तुफान यश मिळवणाऱ्या भाग्यश्रीला सर्वच प्रेक्षक चित्रपटांमध्ये अजून बघण्यासाठी खूपच उत्सुक होते, मात्र तिने या सिनेमानंतर लगेचच चित्रपटांना अलविदा म्हटले आणि लग्न करत संसारात व्यस्त झाली.

आता भाग्यश्रीच्या अभिनयाची परंपरा तिचा अभिनयच वारसा तिचा मुलगा अभिमन्यु पुढे नेत आहे. २०१८ साली ‘मर्द को दर्द नहीं होता’ या सिनेमातून त्याने पदार्पण केले. आता तो ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातील ‘तितर-बितर’ या गाण्यावरील भाग्यश्रीचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. पिवळ्या आणि जांभळ्या रंगाच्या साडीत भाग्यश्री अतिशय सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकरी आणि कलाकार देखील एकापेक्षा एक कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर अभिमन्यूने कमेंट करत लिहिले, “मॉम” आणि सोबत हार्ट ईमोजी देखील पोस्ट केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करताना भाग्यश्रीने लिहिले, “तितर-बितर गाण्याने प्रत्येकालाच डान्स करायला भाग पडले आहे. #tittarbittar प्रेमाला फुलू द्या.” या व्हिडिओमध्ये भाग्यश्रीसोबत तिची लेडी गॅंगदेखील डान्स करताना दिसत आहे.

अभिमन्युचा ‘मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून, या सिनेमात त्याच्यासोबत सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहेत. याशिवाय लवकरच त्याचा ‘निकम्मा’ आणि ‘आंख मिचौली’ सिनेमा देखील प्रदर्शित होणार आहे. तर भाग्यश्रीचा काही दिवसांपूर्वी ‘थलायवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भारीच ना! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी केला ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार

-अरेरे! प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी लीक झाला ‘सूर्यवंशी’; निर्मात्यांमध्ये काळजीचे वातावरण

-‘सूर्यवंशी’ चित्रपटातील नवीन गाणं रिलीझ, ११ वर्षांनी पाहायला मिळाला कॅटरिना आणि अक्षयचा रोमँटिक अंदाज

हे देखील वाचा