अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका अरोरा खूप चर्चेत आली. ती तिच्या रिलेशनमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली. अर्जुन कपूरसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तसेच ते दोघे ही एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असतात. परंतु घटस्फोटाआधी मलायका आणि अरबाज यांना बॉलिवूडमधील ‘पावर कपल’ म्हणून ओळखले जात होते. परंतु त्यांच्या घटस्फोटानंतर त्यांच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.
अरबाज आणि मलायकाने २०१७ मध्ये घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटाचे कारण त्यांनी अजूनही स्पष्ट केले नाही. परंतु वेळोवेळी त्यांच्यातील कडवटपणा दुनियेसमोर आला आहे. एकदा मलायकाने शोमध्ये सगळ्यांसमोर सांगितले होते की, अरबाजची एक सवय तिला अजिबात आवडत नाही. त्याची ती सवय काळानुसार आणखीनच वाढत गेली. (Malaika Arora did not like this habit of Arbaaz Khan, revealed in an interview)
मलायकाने म्हणाली की, “आता जर त्याच्या सगळ्यात वाईट सवयीबाबत बोलायचे झाल्यास, तो खूपच बेजबाबदार आहे. ती घरात कोणतीही गोष्ट कुठेही ठेवतो. यामुळे मी खूप वैतागले होते. सुरुवातीला हा बेजबाबदारपणा जरा तरी कमी होता, परंतु हळूहळू ही सवय वाढतच गेली.” यावर अरबाज म्हणतो की, “मलायका सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने सांभाळते. मलायका कधीच तिची चूक मान्य करत नाही. यावेळी मला खूप त्रास होतो.”
मलायका आणि अरबाजने १९९८ मध्ये लग्न केले होते. त्यांच्या संसारात अनेक चढ-उतार आले. त्यामुळे लग्नाच्या १९ वर्षानंतर त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या घटस्फोटानंतर मलायका आणि अर्जुनच्या रिलेशनबाबत अनेक बातम्या येऊ लागल्या होत्या. अर्जुन हा मलायकापेक्षा वयाने खूप लहान असल्याने त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-