कलाकार त्यांच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटांत तसेच मालिकांमध्ये काम करतात. पण त्यांच्या करिअरमध्ये एखादी अशी मालिका किंवा चित्रपट येतो आणि त्याने कलाकारांना इतकी ओळख मिळते की, ते आयुष्यभरासाठी ती मालिका त्यांच्या नावी होऊन जाते. अशीच झी मराठीवरील एक गाजलेली मालिका म्हणजे ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतील मुख्य भूमिकेत अभिनेत्री म्हणजे मयुरी देशमुख होती.
तसं पाहायला गेलं, तर या आधी मयुरीने इतर मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. पण या मालिकेतील तिचे पात्र आणि अभिनय प्रेक्षकांच्या खास पसंत पडला होता. तिच्या मानसी नावाच्या पात्राने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. त्यात तिचा तो निरागस चेहरा आणि गोड स्माईल यामुळे तर ती सर्वांचे आकर्षण बनली होती. आजही प्रेक्षकांमध्ये तिची तेवढीच क्रेझ आहे. अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे. (Actress mayuri Deshmukh share her glamorous photos on social media)
मयुरीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, मयुरीने निऑन कलरचा एक सुंदर असा शॉर्ट ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने सुंदर असे ईअरिंग घातले आहेत. तसेच केसांना सेमीकर्ल केले आहे. या फोटोशूटमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
तिच्या चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस अंदाज खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहे कोणी तिला ‘परमसुंदरी’ म्हणत आहे तर कोणी ‘प्रीटी गर्ल’ म्हणत आहे. अशाप्रकारे तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव चालू आहे. तिच्या या फोटोला आतापर्यंत ११ हजारापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत.
मयुरीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत अभिज्ञा भावे होती. मालिकेतील तिची मानसी नावाची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच तिने ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘३१ दिवस’ या चित्रपटात काम केले आहे. ती सध्या स्टार प्लस या वाहिनीवरील
‘इमली’ या मालिकेत काम करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-