Thursday, January 29, 2026
Home बॉलीवूड नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई अडकली विवाहबंधनात, बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई अडकली विवाहबंधनात, बॉलिवूड कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

प्रसिद्ध पाकिस्तानी कार्यकर्ती आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने आनंदाची बातमी दिली आहे. ती नुकतीच लग्नबंधनात अडकली असून याची माहिती तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्टर शेअर करून दिली आहे. मलालाच्या लग्नाच्या बातमीवर हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत सर्व कलाकार शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ यांसह अनेक कलाकारांनी नवविवाहित जोडप्याला नवीन प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याव्यतिरिक्त पाकिस्तानी कलाकारांनीही मलालाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मलालाने अधिकृत ट्विटर अकाऊंटवर लग्नाचे अनेक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभरासाठी लग्नाच्या बंधनात बांधले गेलो आहोत. आम्ही बर्मिंघम येथे आपल्या कुटुंबासोबत घरीच छोटासा विवाह सोहळा आयोजित केला होता. कृपया आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही एकत्र आयुष्याच्या प्रवासासाठी खूप उत्सुक आहोत.” (Nobel Prize Winner Malala Yousafzai Got Married Wishes From Actress Priyanka Chopra For Happy Life)

 

मलाला युसुफझाईच्या या पोस्टवर देश आणि जगातील अनेल लोक त्यांना शुभेच्छा देत आहेत. फोटोत मलालाचा पती असर मलिक यावेळी काळ्या रंगाच्या फॉर्मल सूटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे मलाला गुलाबी रंगाच्या सूटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने मलालाचा फोटो अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या या पोस्टमध्ये लिहिले की, “शुभेच्छा मलाला, तुला खूप खूप शुभेच्छा, तू एक परिपूर्ण दृष्टी आहेस.”

Photo Courtesy: Instagram/priyankachopra

प्रियंका चोप्राव्यतिरिक्त कॅनेडियन ब्लॉगर आणि होस्ट लिली सिंगनेही मलालाचे अभिनंदन केले आहे. हॉलिवूड स्टार रईस विथस्पूनने मलाला युसुफझाईचे लग्न अतिशय सुंदर असल्याचे वर्णन केले आहे.

मलाला युसुफझाईने मुलींच्या शिक्षणासाठी खूप काम केले आहे. सर्वात तरुण नोबेल शांतता पुरस्कार विजेती आहे. तिला सन २०१४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी शांतता पुरस्कार मिळाला. मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या मलालाच्या डोक्यात गोळी लागल्याने ती जगभर प्रसिद्ध झाली. त्यावेळी मलाला फक्त १६ वर्षांची होती. युनायटेड नेशन्समध्ये शिक्षणातील लैंगिक समानता या विषयावरील मलालाच्या भाषणाला जगभरातून दाद मिळाली.

मलाला आता विवाहबंधनात अडकली असून जगभरातून तिला तिच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा