Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘चल निघ’, म्हणत उत्कर्ष गेला टीममधून बाहेर; टीममधील सदस्यांची होईल का ताटातूट?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठव्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. या दरम्यान घरात दोन गट पडले होते, परंतु ‘बिग बॉस’ने कार्यादरम्यान दोन्ही गट एकत्र केल्याने त्यांच्यामध्ये अनेक गैरसमज झाले आहेत. दोन्ही टीममध्ये ताटातूट होताना दिसत आहे. वीकेंडला चुगली बूथमध्ये काही चुगली आल्याने मीरा, उत्कर्ष, जय आणि गायत्री यांच्यात भांडण झाली होती. त्याचप्रमाणे ते चौघे टास्कमध्ये देखील वेगळ्या टीममध्ये असतात. अशातच आठव्या आठवड्याचे साप्ताहिक कार्य सुरू झाले आहे.

यावेळी ‘बिग बॉस’ने गार्डन एरियामध्ये काही खांब उभे केले आहेत. यावर घरातील सदस्यांना त्यांच्या नावाचे स्टिकर लावायचे असते. तसेच एक फेरी संपली की, एक खांब बाद करायचा असतो. यावेळी घरातील सदस्यांमध्ये अनेक राडे झाले. या कार्याची संचालिका मीरा होती. कार्यात निथा, गायत्री, मीरा, स्नेहा आणि विकास यांची भांडण झालेली दिसली आहेत. तसेच उत्कर्ष आणि त्याच्या टीममध्ये देखील भांडण झाली. (Bigg Boss Marathi 3 : quarrel between Utkarsh and team ‘A’)

यावेळी गायत्री मीराला सांगते की, “उत्कर्षने आधीच मीनलसोबत डील करून ठेवले होते की, तू पिवळ्या रंगाच्या खांबावर जा, म्हणजे त्यांच्यात आधीच प्लॅनिंग होत आहे.” हे ऐकल्यावर मीरा थेट उत्कर्षकडे जाते आणि त्याला जाब विचारते. यावर उत्कर्ष मात्र खूप चिडतो. त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही म्हणून ओरडतो. यावेळी तो म्हणतो की, “मी असं बोललो पण नाही.” यावर मीरा म्हणते की, “पाहतोय सगळेजण काय खुणवाखुणवी चालली आहे ते.”

नंतर उत्कर्ष म्हणतो की, “तुमचा विश्वास नाही, तर काय उपयोग आहे ना या सगळ्याचा. माहित नाही ना, तर तिला जाऊन विचार चल?” यावर मीरा म्हणते की, “उत्कर्ष तू चुकीचे वागत आहे.” त्यानंतर तो तिथून निघून जातो, तेव्हा जय त्याला थांबवतो, तर तो त्याला देखील “चल निघ,” असं बोलतो आणि निघून जातो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘माझा होशील ना’ फेम अभिनेत्रीला ‘या’ कारणामुळे नाकारला मंदिरात प्रवेश, व्हिडिओ शेअर करून व्यक्त केले दुःख

-कोणी म्हणे ‘परमसुंदरी’, तर कोणी म्हणे ‘प्रीटी गर्ल!’ मयुरी देशमुखचा ग्लॅमरस लूक पाहून सगळेच फिदा

-‘मन उडू उडू झालं’ फेम अजिंक्य राऊतच्या गाडीला अपघात, व्हिडिओ शेअर करत सांगितला अपघाताचा थरारक अनुभव

हे देखील वाचा