Saturday, December 14, 2024
[aioseo_breadcrumbs]

मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार

अभिनेत्री आणि मॉडेल जी तिच्या व्यवसायिक आयुष्यापेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे, ती म्हणजे दिशा परमार. हिंदी टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांमध्ये काम करून तिने प्रेक्षकांच्या मनात तिचे एक खास स्थान निर्माण केले आहे. परंतु जेव्हापासून तिच्या अफेरच्या चर्चा येऊ लागल्या तेव्हापासून सगळेजण तिला ओळखू लागले. दिशा गुरुवारी (११ नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

दिशाचा जन्म ११ नोव्हेंबर १९९२ साली दिल्ली येथे झाला आहे. दिशाने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘प्यार का दर्द है मीठा मीठा‌‌ प्यारा प्यारा’ या मालिकेत काम केले. या मालिकेने तिची सर्वत्र ओळख निर्माण केली. मालिकेतील पंखुडी नावाचे पात्र खूप गाजले होते. (Actress disha Parmar celebrate her birthday, let’s know about her life)

दिशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली आहे. दिशाने याच वर्षी तिचा बॉयफ्रेंड राहुल वैद्यसोबत लग्न केले. त्यांची प्रेमकहाणी संपूर्ण जगाने सुरुवातीपासून पाहिली. राहुलने ‘बिग बॉस १४’ मध्ये दिशाला प्रपोज केले होते. बिग बॉसच्या घरात दिशा त्याला भेटायला गेली होती. तेव्हा राहुलने नॅशनल टेलिव्हिजनवर सगळ्यांसमोर गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. तेव्हा देखील दिशाचा‌ वाढदिवस होता.

राहुल तिला असे टेलिव्हिजनवर प्रपोज करताना खूप घाबरत होता. त्याने स्वतः ही गोष्ट सांगितली होती की, त्याने एका हातात अंगठी पकडली होती. दिशा आणि त्याच्या भेटीबद्दल त्याने सांगितले की, “मी आणि दिशा दोन वर्षापूर्वी एका कॉमन मित्रामुळे भेटलो होतो. आम्ही लगेच एकमेकांसोबत मिक्स झालो आणि बोलायला लागलो.”

सुरुवातीला राहुल आणि दिशा केवळ चांगले मित्र होते. त्यावेळी राहुलला ती आवडत होती. परंतु त्याने ही गोष्ट कबूल केली नाही. ते दोघे एकमेकांंना समजून घेत होते. जसा वेळ गेला तसे ते आणखी जवळ आणि त्यांच्यात चांगली बॉंडिंग झाली. त्यांच्या प्रेमकहाणी नंतर त्यांचे चाहते त्यांच्या लग्नाची खूप वाट बघत होते. या वर्षी त्या दोघांनी लग्न केले आहे. लग्नाच्या आधीपासूनच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांचे संगीत, मेहेंदी, हळद, लग्न, रिसेप्शन हे सगळे कार्यक्रम त्यांनी अगदी आनंदाने साजरे केले. त्यांच्या लग्नात अनेक कलाकारांनी देखील हजेरी लावली होती.

दिशाचा पती आणि अभिनेता राहुल वैद्यबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१७ साली ‘वो अपना सा’ या मालिकेत मुख्य भूमिकेत काम केले होते. तसेच २०१४ साली बॉक्स क्रिकेट लीगमध्ये देखील सहभाग घेतला होता. यासोबतच त्याने ‘याद तेरी’ या म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. तसेच दिशाने अनेक जाहिरातीं‌मध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘असे’ केल्यास प्रियांका चोप्राला बसू शकतो पती निकचा मार, स्वतः केला खुलासा

-बॉलिवूडमध्ये १४ वर्ष पूर्ण केलेल्या रणबीर कपूरने नाकारले होते ‘हे’ सहा सुपरहिट सिनेमे

-नोरा फतेहीचे ‘कुसु कुसु’ गाणे प्रदर्शित, डान्स मूव्ह्जने चुकवला रसिकांच्या काळजाचा ठोका

हे देखील वाचा