बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खान नवाब घराण्यातली असली, तरी ती खूप ‘डाउन टू अर्थ’ आहे. यासोबतच त्यांनी आपल्या मुलीला चांगले संस्कारही दिले आहेत. चाहत्यांना कसे भेटायचे? त्यांना कसे सामोरे जावे? हे सर्व साराला चांगलंच माहिती आहे. सारा अली खान पडद्यावर जितकी ग्लॅमरस दिसते तितकीच ती खऱ्या आयुष्यात साधी आहे. याचा पुरावा तिने पुन्हा एकदा दिला आहे. अलीकडेच सारा आणि विकी कौशल मुंबईत स्पॉट झाले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सारा तिच्या एका चाहत्याकडून वडापाव घेताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सारा तिच्या कारमध्ये बसली आहे आणि विकी कौशल रस्ता क्रॉस करून तिच्या कारकडे जात आहे. दरम्यान, एक चाहता त्याच्या आवडत्या अभिनेत्रीला वडापाव देतो. सारा आनंदाने ते घेते आणि तिच्याकडे ठेवते. साराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या साधेपणाची चाहत्यांना खात्री पटली आहे. युजर्स साराच्या कौतुक करत कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की, “सारा खूप साधी आहे.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सारा खूप गोड आहे.” हा व्हिडिओ एका सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
सारा एक अभिनेत्री आहे आणि त्याचबरोबर ती एवढ्या मोठ्या घराण्याची मुलगी आहे, याचा तिला कसलाही अभिमान नाही. पैसा आणि पदापेक्षा माणूस मोठा नसतो, हे साराने सिद्ध केले आहे. सारा तिच्या वागण्याने चाहत्यांची मने जिंकत आहे.
मात्र, सारा अली खान आणि विकी कौशल त्यांच्या आगामी ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहेत. या चित्रपटात सारा आणि विकी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. सारा अली खान लवकरच अक्षय कुमार आणि साऊथचा सुपरस्टार धनुष याच्यासोबत आनंद एल राय दिग्दर्शित ‘अतरंगी रे’ चित्रपटात दिसणार आहे. या रोमँटिक ड्रामा चित्रपटात साराची दुहेरी भूमिका असल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…










