एकाच क्षेत्रातील दोन दिग्गज जेव्हा एकत्र येतात, तेव्हा तो क्षण कमालीचाच असतो, यात कोणतीही शंका नाही. आता असेच काहीसे झालंय, ते छोट्या पडद्यावरील एका रियॅलिटी शोमध्ये. जिथे डान्सिंगमधील दोन दिग्गज म्हणजेच मलायका अरोरा आणि टेरेन्स लुईस हे डान्स मास्टर्स झळकणार आहेत. हा डान्स रियॅलिटी शो म्हणजेच ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ होय. या दोघांनीही शोदरम्यान आपल्या डान्सची झलक दाखवली. जी आता चाहत्यांना भलतीच आवडत असून डान्सचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
सोनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर या शोमधील एक व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. मलायका आणि टेरेन्सच्या चाहत्यांना या एपिसोडची उत्सुकता लागली आहे. हा शो दर शनिवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता टीव्हीवर पाहायला मिळतो. (Actress Malaika Arora Raises The Stage By Dancing To An English Song With Terence Lewis)
मलायका आणि टेरेन्सने दाखवले कमालीचे मुव्हज
सोनीने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका आणि टेरेन्स दोघेही एका इंग्रजी गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. दोघांचा हा जबरदस्त डान्स पाहून चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दोघांचा डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे.
या व्हिडिओला आतापर्यंत २० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. एका ने कमेंट करत तर चक्क असे म्हटले आहे की, “मलायका जाड झाली आहे किंवा तिचे बेबी बंप आले आहे.”
त्याचबरोबर, काही चाहते असेही आहेत, जे या डान्समध्ये नोरा फतेही आणि गीता कपूरला मिस करत आहेत. या डान्स परफॉर्मन्समध्ये दोघेही असते, तर चार चाँद लागले असते, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.
टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध आहे ‘इंडियाज बेस्ट डान्सर’
‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हा टेलिव्हिजनवरील एक अतिशय लोकप्रिय डान्स शो आहे. यामध्ये मलायका अरोरा, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर सारख्या दिग्गजांचा समावेश आहे. या सर्वांचे स्वतःचे जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. या शोमध्ये नवनवीन आणि प्रतिभावान डान्सर आपल्या डान्स कौशल्याने प्रेक्षकांना भारावून टाकतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…