Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड याला म्हणतात खरी प्रतिभा! नोरा फतेहीच्या ‘कुसू-कुसू’ गाण्यावर ‘या’ मुलांनी केला धमाकेदार डान्स

याला म्हणतात खरी प्रतिभा! नोरा फतेहीच्या ‘कुसू-कुसू’ गाण्यावर ‘या’ मुलांनी केला धमाकेदार डान्स

बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर असलेली नोरा फतेही नेहमी तिच्या डान्समुळे आणि सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत असते. सध्या नोरा तिच्या आगामी ‘सत्यमेव जयते २’ सिनेमामुळे खूप चर्चेत आली आहे. या सिनेमातील तिचे ‘कुसू-कुसू’ गाणे सध्या तुफान व्हायरल होत असून, सर्वांनाच ते आवडत आहे. या गाण्याची क्रेझ लहानमुलांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. यातच नोराने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात काही मुली हुबेहूब नोरा सारखा डान्स करताना दिसत आहे.

नोराने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काही तासातच तो व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले असून, ५ हजारांपेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये तीन मुली फुल्ल एनर्जीने या गाण्यावर डान्स करत असून त्यांच्या मागे दिसणाऱ्या वातावरणानुसार त्या झोपडपट्टीतील दिसत आहे. मात्र असे असूनही त्यांच्या असणारी डान्सची कला सर्वांचेच मनं जिंकून घेत आहे. या व्हिडिओला २२ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना नोराने लिहिले, “किती सुंदर आहे. तुम्ही खरंच अद्भुत आहात.” तिच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट करत लिहिले, “हेच खरे टॅलेंट आहे.”, तर एकाने लिहिले, “चहूबाजूला खूप खूपच प्रतिभा आहे. त्यांना फक्त योग्य प्लॅटफॉर्मची गरज आहे.”

नोराने टीव्ही रियॅलिटी शो बिग बॉसमध्ये देखील सहभाग घेतला होता. २०१८ साली तिने ‘सत्यमेव जयते’ सिनेमात ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर तिने डान्स करत तिने तुफान लोकप्रियता मिळवली. याच गाण्यानंतर नोरा इंडस्ट्रीमध्ये ओळखली गेली. पूर्वी फक्त गाण्यांपुरती चित्रपटांमध्ये दिसणारी नोरा आता चित्रपटांमध्ये अभिनय करताना देखील दिसते. काही दिवसांपूर्वीच तिचा ‘भुज: द प्राइड ऑफ़ इंडिया’ चित्रपट आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधे श्याम’च्या दिग्दर्शकाविरोधात प्रभासच्या चाहत्याने लिहिली सुसाईड नोट, दिली मरण्याची धमकी

-द बिग पिक्चर शोच्या सेटवर लहान मुलांना पाठीवर बसून फिरवताना दिसला सलमान खान

-‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

हे देखील वाचा