Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भारतीय असण्याची सर्वात चांगली गोष्ट कोणती? पाहा काय म्हणाली ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा

लग्नानंतर भलेही प्रियांका चोप्रा विदेशात स्थायिक झाली आहे. पण तरीही परदेशी ती भारतीय सण तिच्या कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात साजरे करते. तिचे यंदाच्या दिवाळीच्या ग्रँड सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ आठवडाभरानंतरही चर्चेत आहेत. प्रियांका यावर्षी युट्युबर लिली सिंगच्या दिवाळी पार्टीमध्ये सहभागी झाली होती. आता या पार्टीतील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकासह तिची गर्ल गॅंग भारतीय असण्याची उत्तम गोष्ट सांगताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये प्रियांकाने भारतीय असण्याची सर्वात चांगली गोष्ट सांगितली आहे. ती म्हणते, “भारतीय असण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे, मी भरपूर मिरच्या खाऊ शकते.” इतरांनीही भारतीय असण्याची चांगली कारणे सांगितली. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये प्रियांका ‘मुंडया तो बचके’ गाण्यावर मित्रांसोबत खूप डान्स करताना दिसली. (priyanka chopras diwali bash at lilly singhs reveals her favourite thing about being indian)

अलीकडेच प्रियांकाने पती निक जोनाससोबतच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते. यात प्रियांका हेवी एम्ब्रॉयडरी लेहेंग्यात आणि निक जोनास फ्लॉवर प्रिंटेड कुर्ता पायजमामध्ये खूप सुंदर दिसत होते.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर प्रियांका चोप्रा मॅट्रिक्स या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. तिने सेटवरील तिच्या दोन सहकाऱ्यांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये डीप नेक ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत होती. याआधी प्रियांका सिटाडेल सीरिजच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. तिचे अनेक प्रकल्प रांगेत आहेत. यामध्ये काही हॉलिवूड आणि काही बॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-राजकुमार- पत्रलेखाच्या एंगेजमेंटचा व्हिडिओ आला समोर; फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’

-पॅपराजीने पोझ द्यायला सांगताच भडकला रणबीर कपूर, रागाच्या भरात म्हणाला…

-राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

हे देखील वाचा