राजकारण आणि चित्रपटसृष्टी यांचं जुनं नातं राहिलं आहे. अनेक कलाकार असे आहेत, ज्यांनी राजकारणाची वाट धरली. यामध्ये रजनीकांत, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, सुनील दत्त यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. यापैकी काही कलाकार राजकारणात यश न आल्याने यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतात. असेच काहीसे आता पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्राबंती चटर्जीने भारतीय जनता पार्टीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. श्राबंती यावर्षीच पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुका सुरू होण्यापूर्वी भारतीय जनता पक्षात सामील झाली होती. मात्र, एक वर्षही पूर्ण न होता, तिने भाजपमधून राजीनाम्याची घोषणा केली आहे.
भाजपमध्ये १ मार्च, २०२१ रोजी सामील झालेल्या अभिनेत्री श्रांबतीने सोशल मीडियावर अधिकृत निवेदनाद्वारे पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालसाठी काम करण्याबाबत गंभीर नसल्यामुळे अभिनेत्रीने भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राजीनाम्यामागचे कारण सांगितले आहे. चटर्जीने ट्वीट करून लिहिले की, “ज्या पक्षाच्या तिकिटावर मी मागची निवडणूक लढवली होती, त्या पक्षाशी माझे संबंध संपवत आहेत. पश्चिम बंगालचा मुद्दा पुढे नेण्यात पक्षाचा पुढाकार आणि गांभीर्य नसणे हे माझ्या निर्णयाचे कारण आहे.” (Famous Bengali Actress Srabanti Chatterjee Quits BJP Here Know The Reason)
Severing all ties with the BJP, the party for which I fought the last state elections.Reason being their lack of initiative and sincerity to further the cause of Bengal…
— Srabanti (@srabantismile) November 11, 2021
यानंतर सोशल मीडियावर अनेक लोक अभिनेत्रीला प्रश्न विचारत आहेत की, ती आता कोणत्या पक्षात जाणार आहे. तसेच, अनेक लोक तिला ट्रोल देखील करत आहेत. दरम्यान, तृणमूलने (टीएमसी) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जर तिला पक्षात जायचे असेल, तर त्यावर विचार केला जाईल. दक्षिण कोलकाता येथील बेहाला पश्चिम मतदारसंघातून टीएमसी नेते पार्थ चटर्जी यांच्या विरोधात पक्षाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केलेली लोकप्रिय अभिनेत्री ५०,००० हजारांहून अधिक मतांच्या फरकाने पराभूत झाली होती. याशिवाय राजकारणातील अनुभवाचा अभाव आणि निवडणुकीत अपयश आल्याने श्राबंतीला टीकेला सामोरे जावे लागले होते.
अभिनेत्रीच्या राजीनाम्यावर पक्षाच्या नेत्याची प्रतिक्रिया
अभिनेत्रीने पक्ष सोडल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार म्हणाले की, “मला माहिती नाही की, निवडणुकीनंतर ती पक्षासोबत होती की नाही. याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.” याव्यतिरिक्त भाजप नेते तथागत रॉय यांनी लिहिले की, “अभिनेत्री श्राबंती चटर्जीचा भाजप किंवा त्यांच्या विचारसरणीशी काहीही संबंध नव्हता, तिला पक्षात समाविष्ट करून तिकीट दिले गेले, भरपूर पैसा होता. खर्च केला, निवडणुका हरल्या आणि आता पक्ष सोडला. मला समजत नाही की, प्रत्येकजण याबद्दल इतका उत्साहित का आहे?” रॉय यांनी अशा लोकांना पक्षात सामावून घेण्यावर टीका केली होती, ज्यांना कोणताही राजकीय आधार नाही आणि विशेषत: ते मनोरंजनाच्या जगातून आलेले आहेत.
‘या’ कलाकारांनीही ठोकला राजकारनाला रामराम
राजकारनाला रामराम ठोकणारी श्रीबंती ही एकमेव अभिनेत्री नाहीये. तिच्यापूर्वी तनुश्री चक्रवर्ती, अनिद्या बॅनर्जी आणि रुपा भट्टाचार्यसह टॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मागील काही महिन्यांमध्ये पक्षाची साथ सोडली आहे. याव्यतिरिक्त प्रसिद्ध अभिनेता बोनी दासगुप्ता आणि यश दासगुप्ता यांसारख्या इतर कलाकारांनी राजकारनापासून अंतर बाळगत आपल्या चित्रपट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहेत. असे म्हटले जात आहे की, कदाचित श्राबंती आता अभिनयावर लक्ष केंद्रित करेल.
‘कबेरी अंतरधन’च्या प्रदर्शनाची वाट पाहतेय श्राबंती
सध्या श्राबंती तिचा आगामी चित्रपट ‘कबेरी अंतरधन’च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत प्रथमच प्रोसेनजीत चटर्जी दिसणार आहे. चित्रपटात ७०च्या दशकातील बंगालमधील आणीबाणी दाखवण्यात येणार आहे. कौशिक गांगुली यांनी या रोमँटिक थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. श्राबंती व्यतिरिक्त अभिनेता कौशिक सेन, चुन्नी गांगुली, अंबरीश भट्टाचार्य आणि पूरब सील आचार्य हे देखील चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ
-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’










