Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

भन्साळींच्या घरी जेवताना दीपिकाने रणवीरकडे प्रेमाने केली ‘ही’ विनंती, वाचा ‘दीपवीर’च्या पहिल्या डेटचा किस्सा

बॉलिवूडचे ‘पावर कपल’ दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे रविवारी (१४ नोव्हेंबर) आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस आहे. सध्या दोन्ही कलाकार आपापल्या कामात व्यस्त आहेत. अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेल्या रणवीर-दीपिकाची प्रेमकहाणी खूपच रंजक आहे. ‘रामलीला’ या चित्रपटानंतरच दीपिका आणि रणवीर एकमेकांच्या जवळ आले, पण सत्य हे आहे की, चित्रपटाच्या शूटिंगपूर्वीच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. आज त्यांच्या लग्नाच्या तिसर्‍या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया, बॉलिवूडची ही सर्वात प्रसिद्ध प्रेमकहाणी कशी सुरू झाली.

रणवीर आणि दीपिकाने १४ नोव्हेंबर, २०१८ रोजी इटलीमध्ये लग्न केले. इटलीतील लेक कोमो येथील ७०० वर्षे जुन्या व्हिला डेल बाल्बियानेलो येथे कोकणी आणि नंतर सिंधी रितीरिवाजांनुसार या जोडप्याने लग्न केले.

‘अशी’ सुरू झाली प्रेमकहाणी
‘रामलीला’ या चित्रपटाच्या कास्टिंगसाठी रणवीर आणि दीपिका यांची नावे जवळपास निश्चित झाली होती. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या घरी दोघांची भेट झाली. तिथे दोघांनी एकत्र जेवण केले. यादरम्यान दीपिकाच्या दातांमध्ये अन्न अडकले. हे पाहून रणवीरने दीपिकाला दातांमध्ये काहीतरी अडकल्याचे संकेत दिले, तेव्हा दीपिकाने रणवीरला प्रेमाने सांगितले की, “तू ते काढून टाक.” तिथेच दोघांची मने जुळली. आजही रणवीर आणि दीपिका ही भेट आपली पहिली डेट मानतात.

एकमेकांमध्ये हरवले रणवीर-दीपिका
‘रामलीला’च्या शूटिंगदरम्यान रणवीर आणि दीपिकाचे अनेक लव्ह मेकिंग सीन होते. असे म्हणतात की, काही सीन करताना दोघेही इतके हरखून गेले होते की, दिग्दर्शक कट बोलूनही ते थांबले नाहीत.

कोणते सीन पाहून लोक झाले आश्चर्यचकित
‘अंग लगा दे रे’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यान असे म्हटले जाते. या गाण्यातील किसिंग सीन अतिशय पॅशनेट पद्धतीने करण्यात आला आहे. या चित्रपटानंतर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली.

 ‘हे’ चित्रपट केले एकत्र
‘रामलीला’ चित्रपटानंतर दीपिका आणि रणवीरने ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘पद्मावत’मध्ये एकत्र काम केले आहे. याशिवाय या दोघांची जोडी ‘८३’ चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

-मोठे केस, मोठी दाढी अन् कपाळी टिक्का; ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनचा डॅशिंग लूक रिलीझ

-‘पंगा क्वीन’ कंगनाने भारताच्या फाळणीवर प्रश्न केले उपस्थित, म्हणाली, ‘आपण स्वातंत्र्य सैनिकांचा…’

हे देखील वाचा