Thursday, April 24, 2025
Home मराठी ब्रेकिंग.! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, वयाच्या शंभराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्रेकिंग.! शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन, वयाच्या शंभराव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कलाविश्वातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवार (१५ नोव्हेंबर) रोजी निधन झाले. ते १०० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, सोमवारी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

बाबासाहेबांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. महत्त्वाचं म्हणजे, मागील काही दिवसांपूर्वी पाय घसरून पडल्याने बाबासाहेब गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तसेच त्यांमा निमोनिया झाल्याचेही रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार देऊन गौरवले.

बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल थोडंसं
ऐतिहासिक विषयांवरील लेखन हीच बाबासाहेब पुरंदरे यांची खरी ओळख. याव्यतिरिक्त त्यांनी ललित कादंबरी लेखन आणि नाट्यलेखनही केले. विशेष म्हणजे, ‘जाणता राजा’ या ऐतिहासिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुराही त्यांनी लीलया पार पाडली.

बाबासाहेब पुरंदरे यांचे ‘राजा शिवछत्रपती’, ‘पुरंदऱ्यांची दौलत’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’, गड- किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य, ‘शेलारखिंड’ यांसारखे साहित्य प्रकाशित झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाच्या १६ आवृत्या प्रकाशित झाल्या. त्याचबरोबर ५ लाखांपेक्षाही अधिक प्रती प्रकाशित झाल्या.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कंगनाच्या ‘त्या’ वक्तव्याचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्याकडून समर्थन, म्हणाले, ‘योद्ध्यांना फाशी…’

-भन्साळींच्या घरी जेवताना दीपिकाने रणवीरकडे प्रेमाने केली ‘ही’ विनंती, वाचा ‘दीपवीर’च्या पहिल्या डेटचा किस्सा

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

हे देखील वाचा