Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोरा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ ती सातत्याने तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. परंतु यावेळी ती तिच्या फोटोमुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. मलायकाने सोशल मीडियावर एक क्यूट व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये लहान मुलांनी तिला घेरले आहे. यामध्ये ती लहान मुलांसोबत बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा मलायकाचा गाल देखील ओढतो. यावर तिने त्या मुलाला मिठी मारली.

मलायकाने तिचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ ‘इंडियाज बेस्ट डान्सर २’ च्या मंचावरील आहे. यामध्ये तिने सोनेरी रंगाचा सुंदर असा बॉडी काँन ड्रेस घातला आहे. तिचे सगळे छोटे छोटे चाहते तिच्याभोवती उभे असतात. यामध्ये ती लहान मुलांशी खूपच प्रेमानी बोलताना आणि वागताना दिसत आहे. त्यांचा हा प्रेमळ व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आहे. (Malaika Arora showed love to kinds ar India’s best dancer sjo6 set, one young boy pulls actress cheeks)

मलायकाने शेअर केलेल्या या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘जॉय ऑफ लिटिल थिंग्ज’ नावाचे एक इंग्रजी गाणे लागले आहे. मलायकाने लहान मुलांसोबत शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. अनेक चाहते या व्हिडिओ वर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिचे चाहते या व्हिडिओवर ‘ब्युटीफूल’, ‘क्यूट’, ‘लव्हली’ अशा प्रतिक्रिया देत आहेत.

मलायका बऱ्याचवेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती तिच्या आणि अर्जुन कपूरच्या रिलेशनमुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत असते. खास गोष्ट म्हणजे अर्जुन हा तिच्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-फाटक्या स्टाईलचे कपडे घालून लोकांसमोर आली उर्फी जावेद, ड्रेस पाहून तुम्हीही घालाल तोंडात बोटे

-अर्रर्र, हे काय झालं! शाहिद कपूरच्या पत्नीच्या चेहऱ्यावर दिसले किडे, व्हिडिओ जोरदार व्हायरल

-लॅम्बोर्गिनीच्या बोनेटवर ठेऊन चाऊमीन खाताना दिसला कार्तिक आर्यन, अभिनेत्याच्या साधेपणावर भाळले चाहते

हे देखील वाचा