Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यावर भडकला ‘हा’ अभिनेता, अमित शाह यांच्याकडे केली अटकेची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आहे. ‘स्वातंत्र्य ही भारताला मिळालेली भीक आहे’, तिच्या या वाक्यामुळे सगळेजण तिच्यावर प्रश्न चिन्ह उभे करत आहेत. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार तसेच अनेक राजकीय नेते देखील तिला खडेबोल सुनावत आहेत. तसेच तिच्यावर देशद्रोहीचा आरोप लावत आहेत.

आता बॉलिवूड अभिनेता केआरके याने देखील कंगनाच्या अटकेची मागणी केली आहे. कंगनाने केलेल्या वक्तव्यावर त्याने सोशल मीडियावर सरकार विरोधात प्रश्न उठवला आहे की, त्यांनी अजून कंगनाला अटक का केले नाही? केआरके हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. तो देखील सामाजिक आणि राजकीय मुद्यांवर त्याचे मत मांडत असतो. (Bollywood actor krk angry on kangana Ranaut on independence in 1947 was bheek demanding to home minister amit shah to arrest the actress )

केआरकेने ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, “जर एखाद्या मुस्लिमाने स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला असता आणि स्वातंत्र्याला भीक म्हटले असते, तर त्याला देशद्रोही म्हणून अनेक वर्ष जेलमध्ये बंद ठेवले असते. मग कंगना रणौतला का अटक केले नाही?” या ट्वीटमध्ये त्याने गृहमंत्री अमित शाह, दिल्ली, मुंबई हिमाचल आणि यूपी पोलिसांना टॅग केले आहे.

https://twitter.com/kamaalrkhan/status/1460103239077142529?s=20

केआरकेने लिहिलेले हे ट्वीट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकजण त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी कंगना एका कार्यक्रमाला पोहचली होती तेव्हा तिने तिच्या करिअर व्यतिरिक्त राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर तिचे मत व्यक्त केले होते. यावेळी तिने म्हटले की, “देशाला खरे स्वतंत्र २०१४ साली मिळाले. १९४७ मध्ये केवळ भीक मिळाली होती.” यानंतर ती खूप चर्चेत आली. तसेच आता तिला देशद्रोहीच्या आरोपाखाली सर्वत्र अटक करण्याची मागणी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा