‘बिग बॉस मराठी’च्या घरात आठवा आठवडा खूपच रंगतदार होता. टास्कमध्ये एकमेकांच्या विरोधात काढणारे, हाणामाऱ्या करणाऱ्या सदस्यांचे भावनिक रुप या आठवड्यात पाहायला मिळाले आहे. कॅप्टन्सी टास्कदरम्यान घरातील सदस्यांना कॅप्टन उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी काहीतरी गमवावे लागणार होते. यावेळी घरातील सगळ्याच सदस्यांनी दिलदारपणा दाखवून त्यांच्याजवळील गोष्टींचा त्याग केला आहे. अशातच आठव्या आठवड्यातील इलिमिनेशन देखील पार पडले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी घरात दुसरी वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. घरात अभिनेत्री निथा शेट्टी साळवी हिचा प्रवेश झाला. तब्बल ५० दिवसांनंतर घरात आलेली ही मुलगी नक्की कोणत्या ग्रुपमध्ये जाईल याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती. घरात निथाचा प्रवेश होताच घरातील सदस्यांमध्ये कुजबुज झाली की, ही नक्की कोणत्या ग्रुपमध्ये जाईल की, तिची ती एकटी खेळेल. (Bigg Boss Marathi 3 : second wild card entry nitha shetty get eliminate from house)
निथाने दोन आठवडे खूप चांगला खेळ खेळला. टास्क असो किंवा इतर कोणत्याही गोष्टी असो, तिने मनापासून सगळं काही केले आहे. परंतु प्रेक्षकांचा पाठिंबा कमी मिळाल्याने निथा दोन आठवड्यातच घराबाहेर पडली. तिचे घरात तिचे मीनल आणि विशाल यांच्याशी खूप चांगले बॉंडिंग झाले होते. तिने विशाल कॅप्टन बनवा यासाठी तिच्या मुलीने दिवाळीत दिलेले ग्रीटिंग देखील नष्ट केले होते. एकंदरीत तिचा पंधरा आठवड्याचा प्रवास खूप चांगला होता. प्रेक्षकांना देखील तिचा घरातील वावर आवडत होता. परंतु व्होटिंग कमी झाल्याने या आठवड्यात ती घराबाहेर गेली आहे.
बिग बॉसच्या घरातून जाताना निथा काहीशा प्रमाणात भावुक झाली होती. ती जाताना विशाल तिला मिठी मारत रडत होता. यावरूनच दोन आठवड्यात तिने काय कमावले होते. याचा अंदाज प्रेक्षक लावत आहेत. तसेच तिला जाताना घरातील तिचा दोन आठवड्याचा प्रवास देखील दाखवण्यात आला आहे.