Thursday, January 15, 2026
Home साऊथ सिनेमा आणखी एका कलाकाराला हृदयविकाराच्या झटक्याने गमवावे लागले प्राण, चाहत्यांना बसला धक्का

आणखी एका कलाकाराला हृदयविकाराच्या झटक्याने गमवावे लागले प्राण, चाहत्यांना बसला धक्का

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक सी.व्ही. शशिकुमार यांचे निधन झाले आहे. ५७ वर्षीय शशिकुमार यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतर त्यांचे प्राण वाचवता आले नाही. दिग्दर्शकाच्या जवळच्या लोकांंनी सांगितले की, काही दिवसांपासून ते चेन्नईतील पोरूर येथील रुग्णालयात कर्करोगावर उपचार घेत होते. रविवारी (१४ नोव्हेंबर) त्यांची प्रकृती खालावली आणि हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

‘महाभारत’चे केले होते दिग्दर्शन
सी.व्ही. शशिकुमार यांनी तमिळ भाषेतील लोकप्रिय टीव्ही मालिका ‘महाभारत’ बनवली. याशिवाय त्यांनी ‘सेनगोट्टई’ चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. चित्रपटसृष्टीतील लोकांना अंत्यदर्शनासाठी दिग्दर्शकाचे पार्थिव त्यांच्या मदुरवॉयल येथील निवासस्थानी नेण्यात आले आहे. सोमवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले आहेत.

सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यांना वाहिली श्रद्धांजली
सी.व्ही. शशिकुमार यांच्या निधनानंतर चाहते आणि त्यांचे प्रियजन सोशल मीडियावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांनी केलेल्या कामगिरीसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा