मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराव त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. अनेक चित्रपटात वाखण्याजोग्या भूमिका साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात आपले खास स्थान निर्माण केले आहे. मात्र सिनेसृष्टीतून त्याच्याबद्दल अशी बातमी समोर येत आहे, जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
अनिकेतवर त्याच्या पत्नीने मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप लावला आहे. या आरोपामुळे अभिनेत्यावर पोलिसांनी ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नव्हे, तर अनिकेतच्या आई वडिलांवर देखील या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीमध्ये म्हटल्याप्रमाणे, हा प्रकार मुंबईतील दहिसर येथील विश्वासराव रेसिडेन्सी येथे, १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ दरम्यान घडला आहे. (actor aniket vishwasrao charged wife abuse fir lodged pune kothrud)
अनिकेतची पत्नी स्नेहा हिने तिच्या फिर्यादीत अभिनेत्यावर अनेक आरोप लावले आहेत. तिने म्हटल्याप्रमाणे, बाहेरील अनैतिक संबंध, तसेच करियरमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल या भीतीने तिला गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो. हाताने मारहाण करुन लोकांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन अतोनात छळ देखील केला. स्रेहाच्या सासु, सासरे यांनी फिर्यादीवर होणार्या अत्याचाराला न रोखता दुजोरा दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CKqQRUNHm99/?utm_source=ig_web_copy_link
अनिकेत विश्वासरावप्रमाणे, त्याची पत्नी स्नेहा चव्हाण देखील एक अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिका तसेच चित्रपटातही काम केले आहे. विशेष म्हणजे, स्नेहाच्या आई राधिका चव्हाण या देखील मराठी मालिकेत अभिनेत्री आहेत.
https://www.instagram.com/p/CSGiv4TjuW5/?utm_source=ig_web_copy_link
स्नेहा आणि अनिकेत यांनी २०१८ मध्ये कुटुंबाच्या संमतीने लग्न केले होते. गेल्या काही दिवसांपासून स्रेहा व अनिकेत यांच्यात वाद होत होता. या वादाला कंटाळून फेब्रुवारी २०२१मध्ये स्नेहा माहेरी पुण्यात आली. त्यानंतर आता तिने अलंकार पोलीस ठाण्यात मानसिक व शारीरीक छळ केल्याची फिर्याद दिली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?
-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’
-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे