Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, शिल्पा शेट्टीने पतिला दिल्या शुभेच्छा; म्हणाली, ‘चांगल्या वाईट परिस्थितीत…’

लग्नाला १२ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, शिल्पा शेट्टीने पतिला दिल्या शुभेच्छा; म्हणाली, ‘चांगल्या वाईट परिस्थितीत…’

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा अश्लील व्हिडिओ प्रकरणात जेलमध्ये जाऊन आल्यानंतर लागोपाठ त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. परंतु आता शिल्पा शेट्टीने सांगितले आहे की, ती राज कुंद्रासोबत घटस्फोट घेणार नाही. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा सोमवारी (२२ नोव्हेंबर) त्यांच्या लग्नाचा १२ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

या वेळी शिल्पा शेट्टीने इंस्टाग्रामवर तिचा आणि राज कुंद्राचा त्याच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, त्यांच्या लग्नातील काही क्षण दिसत आहेत. यात तर दोघे फेरे घेताना, तसेच राज कुंद्रा तिला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. (Shilpa Shetty and raj Kundra celebrate 12 th anniversary of wedding, she wrote motivational quote on social media)

हे फोटो शेअर करून तिने एक सुंदर संदेश देखील दिला आहे. हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “१२ वर्षापूर्वी आम्ही एकमेकांना चांगल्या वाईट परिस्थितीत साथ देण्याचे, प्रेम करण्याचे वचन दिले होते हे अजूनही कायम आहे. आम्ही प्रत्येक दिवशी देवाकडे आम्हाला चांगला रस्ता दाखवण्याची प्रार्थना करत आहोत. १२ वर्ष पूर्ण झाले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कुकी (राज कुंद्रा) अनेक इंद्रधनुष्य, हास्य आणि आपल्या मुलांसाठी. आमचे हित चिंतक जे आमच्या प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत सोबत होते त्यांना धन्यवाद.”

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचे लग्न २२ नोव्हेंबर २००९ साली झाले होते. ते दोघे अनेकवेळा त्यांच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत असतात. परंतु राज कुंद्रा जेलमधून बाहेर आल्यानंतर ते सहसा एकत्र दिसले नाही. राज कुंद्राला अटक झाल्यानंतर बराच काळ ती सोशल मीडियापासून दूर होती. तिने करवाचौथनिमित्त देखील फोटो शेअर केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा