ऑक्टोबर महिन्यात क्रूझमध्ये पार्टी करताना अं’मली पदार्थ प्रकरणात पकडला गेलेला आर्यन खान, तेव्हापासून चांगलाच चर्चेत असतो. तर त्याच्यासोबत पकडले गेलेले अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा देखील मीडियामध्ये सतत चर्चेचा विषय असतात. नुकतेच शुक्रवारी (२६ नोव्हेंबर), अरबाज मर्चंटने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कार्यालयात हजेरी लावली. यावेळी अरबाज मर्चंटसोबत त्याचे वडील असलम मर्चंटही होते. अं’मली पदार्थ पार्टीत पकडलेल्या आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजर राहण्याच्या अटीवरच जामीन मंजूर केला होता. ही अट पूर्ण करत अरबाज एनसीबीच्या कार्यालयात पोहचला होता.
या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अरबाज मर्चंट एनसीबी कार्यालयात हजेरी लावून बाहेर पडत होता. यादरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पॅपराजींनी त्याला फोटो क्लिक करण्यास सांगितले. त्यानंतर त्याचे वडील असलम मर्चंट यांनी त्यांचा मुलगा अरबाज मर्चंटला पोझ देण्यासाठी थांबवले. यावेळी वैतागलेल्या अरबाजने डोक्याला हात मारून घेतला आणि तिथून निघून जाऊ लागला. तेवढ्यात वडील पुन्हा त्याला थांबवू लागले. तेव्हा तो संतापला आणि ‘डॅड स्टॉप इट यार’ म्हणत, फोटो क्लिक न करताच तिथून निघून गेला.
Arbaaz merchant and his father at NCB office ???? pic.twitter.com/3XwhH7J4ZP
— Black Tiger (@HudHuddDabangg) November 26, 2021
हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. तसेच नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. त्याचवेळी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही शुक्रवारी दुपारी त्याची साप्ताहिक हजेरी लावण्यासाठी एनसीबी कार्यालयात पोहोचला. एनसीबी कार्यालयातून बाहेर पडताना तो देखील पॅपराजींच्या कॅमेऱ्यात कैद झाला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अर्रर्रर्र! कॅटरिना कैफ आणि विकी कौशल करणार नाही लग्न? नातेवाईकाने केला मोठा खुलासा
-Bigg Boss 15; जय भानुशाली झाला शोमधून आऊट, तर नेहा भसीन आणि विशाल कोटियानही झाले बेघर