Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड हार्ट अ‍टॅकमधून सावरल्यानंतर रेमो कामावर रुजू, पहिलाच हटके व्हिडीओ बनवत पाहा कुणाचे मानले आभार

हार्ट अ‍टॅकमधून सावरल्यानंतर रेमो कामावर रुजू, पहिलाच हटके व्हिडीओ बनवत पाहा कुणाचे मानले आभार

बॉलीवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरिओग्राफर रेमो डिसुझा त्याच्या आजारपणानंतर पहिल्यांदाच थिरकत आहे. त्याच्या हा डान्स विडिओ सध्या खूप वायरल होत आहे. रेमो डिसुझाला मागच्या महिन्यात हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला कोकिलाबेन रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्याच्यावर हार्टसर्जरी झाली आणि त्यात असलेले ब्लॉकेज काढण्यात आले होते. आता रेमो पूर्णतः ठीक झाला आहे. ठीक झाल्यानंतर रेमोचा एक डान्स विडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरत आहे.

रेमोने त्याच्या पूर्ण रिकव्हरी नंतर पुन्हा एकदा डान्सकडे वळला आहे. रेमोने त्याच्या ‘स्ट्रीट डान्सर ३ D ‘ चित्रपटामधील ‘मुकाबला’ या गाण्यावर डान्स करत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओतून त्याने त्याची काळजी घेणाऱ्या आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टरांना धन्यवाद म्हटले आहे,

 

हा व्हिडिओ पोस्ट करताना रेमोने लिहिले, “माझ्यासाठी डान्स हा आनंद आणि माझ्या आयुष्याचे हृदय आहे. कोकिलाबेन हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद.”

रेमोच्या हा व्हिडिओ खूप कमी वेळात जबरदस्त वायरल झाला आहे. या व्हिडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. रेमो डिसुझाला १८ डिसेंबरला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. एवढ्या दिवसांच्या आरामानंतर रेमो पुन्हा कामावर परतला असून, त्याने सर्वप्रथम हा व्हिडिओ करत डॉक्टरांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहे.

रेमो हा बॉलीवूडमधला सर्वात यशस्वी कोरिओग्राफर आहे. त्याने प्रचंड संघर्ष करून यश मिळवले. डान्सचे कोणतेही ट्रेनिंग न घेता फक्त टीव्हीवर मायकल जॅक्सनचा डान्स बघत तो डान्स शिकला. या इंडस्ट्रीमध्ये त्याने येण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्याला सिनेमातील मुख्य कलाकारांसोबत डान्स करण्याची पहिली संधी रंगीला सिनेमात मिळाली. त्यानंतर त्याने नृत्यदिग्दर्शक अहमद खान यांच्यासोबत सहायक नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले. त्यानंतर त्याने सोलो सोनू निगमच्या दिवाना अल्बम कोरिओग्राफ केला.

मात्र त्याला खरी ओळख आणि प्रसिद्धी दिली ती कांटे सिनेमातील ‘इश्क समनदर’ गाण्याने. यानंतर कधीच त्याने मागे वळून पाहिले नाही. रेमोने अनेक बड्या कलाकरांना त्याच्या तालावर नाचवले आहेत. अनेक हिट गाणे त्याने कोरिओग्राफ केले. या क्षेत्रात यशस्वी होत असतानाच त्याने चित्रपट दिग्दर्शनात देखील पाऊल टाकले. त्याने ‘फालतू’ सिनेमातून त्याच्या पहिल्या दिग्दर्शकीय क्षेत्रात यशस्वी एन्ट्री केली. डान्सवर आधारित अनेक सिनेमे रेमोने तयार केले.
मोठ्या पडदयावर हिट होत असताना त्याने छोटा पडदा देखील जोरदार गाजवला. टीव्ही वरील अनेक डान्स रियालिटी शो मध्ये त्याने जज म्हणून काम केले आहेत.

हे देखील वाचा