आरआरआर हा चित्रपट मागील बर्याच काळापासून चर्चेत आहे. साऊथ सुपरस्टार राम चरण, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण, श्रिया सरन आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा बहूप्रतिक्षीत चित्रपटांपैकी एक आहे. सर्व प्रेक्षकांना हा सिनेमा कधी प्रदर्शित होतो याची उत्सुकता आहे. मात्र आता या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी आरआरआर चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये रामचरण आणि एनटीआर दिसत असून, रामचरण घोड्यावर बसलेला आहे तर एनटीआर गाडीवर दिसत आहे. हे पोस्टर शेअर करत राजामौली यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा देखील केली आहे.
राजामौली यांनी हे पोस्टर शेअर करत लिहिले की, ह्या १३ ऑक्टोबरला अग्नी आणि पाणी येणार एकत्र. हा अनुभव तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. आम्ही सज्ज आहोत भारतातल्या या सर्वात मोठा अनुभव तुम्हाला देण्यासाठी.”
This October 13, witness Fire ???? and Water ???? come together as a FORCE that has never been experienced before ✊????
The biggest collaboration in Indian cinema is set to deliver a memorable experience!!!
THE RIDE BEGINS…#RRRMovie #RRRFestivalOnOct13th #RRR pic.twitter.com/SawlxK34Yi
— RRR Movie (@RRRMovie) January 25, 2021
आलियाने देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले ,” आरआरआरसाठी तयार राहा चित्रपटगृहांमध्ये १३.१०.२०२१”. पण या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये आलिया नव्हती. त्यामुळे आता पुढच्या पोस्टरमध्ये कदाचित आलिया असणार असे सांगितले जात आहे.
Get ready for RRR, in cinemas on 13.10.2021#RRRFestivalOnOct13th #RRR #RRRMovie @ssrajamouli @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @oliviamorris891 @thondankani @RRRMovie @DVVMovies pic.twitter.com/dfxzOpUp9k
— Alia Bhatt (@aliaa08) January 25, 2021
या चित्रपटाचे पोस्टर रिलीज होताच खूप वायरल झाले असून खूपच कमी वेळात या पोस्टरवर लाईक्सचा वर्षाव झाला आहे. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट १९२० मधील क्रांतिकारक अल्लुरी सितारामा राजू आणि कोरामाराम भीमा यांच्या जीवनावर आधारित आहे. मल्टीस्टारर पीरियड ड्रामा असणारा हा चित्रपट ८ जानेवारी २०२१ रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र करोना व्हायरसमुळे या चित्रपटाचे शूटिंग मधेच थांबले, त्यामुळे या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.