Monday, August 4, 2025
Home मराठी समीर चौगुले यांना मिळाली ‘या’ दिग्गज व्यक्तीकडून खास भेटवस्तू, सोशल मीडियावर दिली माहिती

समीर चौगुले यांना मिळाली ‘या’ दिग्गज व्यक्तीकडून खास भेटवस्तू, सोशल मीडियावर दिली माहिती

मराठी मनोरंजन क्षेत्रात विनोदाला खूप महत्त्व आहे. अशातच टेलिव्हिजनवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो खूपच गाजत आहे. या शोने संपूर्ण महाराष्ट्राला हास्याच्या महासागरात सोडले आहे. यातील विनोदवीर समीर चौगुले (Samir Choughule) यांनी तर सर्वांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांना सगळ्यांनी ‘विनोदाचा बादशाह’ अशी पदवी दिली आहे. अशातच त्यांना त्याच्या कामानिमित्त कौतुकाची थाप मिळाली आहे.

समीर चौगुले यांना आतापर्यंतच्या या प्रवासात खास अशी कौतुकाची थाप देणारी एक भेटवस्तू मिळाली आहे. समीर चौगुलेने सोशल मीडियावर एक पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. विनोदवीर समीर चौगुले यांना गाणकोकिळा लता मंगेशकर यांच्याकडून त्यांच्या कामानिमित्त कौतुकाची थाप मिळाली आहे. त्यांनी एका कार्डवर समीर चौगुले आणि हास्य जत्रा टीमचे कौतुक करणारे शब्द लिहिले आहे. तसेच त्यांना एक खास भेटवस्तू पाठवली आहे. (Samir choughule share his special gift on social media)

या गोष्टीची माहिती समीर चौगुले यांनी इंस्टाग्रामवर दिली आहे. त्यांनी लता दीदींनी दिलेले पत्र शेअर केले आहे. हे पत्र शेअर करून त्यांनी भली मोठी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “निसर्ग किती ग्रेट आहे ना! शब्द संपले की भावनांना वाट मिळावी म्हणून त्याने अश्रूंची निर्मिती केली. आज ते प्रकर्षाने जाणवलं. आज सुरांची आणि स्वरांची सरस्वती आदरणीय लता मंगेशकर दीदींनी अत्यंत प्रेमाने घरी एक भेटवस्तू आणि माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ट्रॉफी पाठवली. आणि ती ट्रॉफी म्हणजे दिदींच्या हस्ताक्षरातील शुभेच्छा आणि आशीर्वाद. थिजून जाणं म्हणजे काय ते आज मला कळलं. लतादीदी महाराष्ट्राची हास्यजत्रा नेहमी बघतात आणि खूप हसतात. एन्जॉय करतात ही आम्हा महाराष्ट्राची हास्यजत्रा कुटुंबियांसाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.”

पुढे त्यांनी लिहिले की, “हा सुवर्णक्षण आयुष्यात आला तो फक्त आणि फक्त आमच्या हास्यजत्रा कुटुंबामुळे. मनःपूर्वक आभार सोनी मराठीचे हेड श्री. अजय भालवणकरसर, नॉन फिक्शन हेड अमित फाळकेसर, ईपी गणेश सागडे, सिद्धूगुरू जुवेकर आणि आमचं विद्यापीठ सचिन गोस्वामी सर आणि सचिन मोटे सर. ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे केवळ अशक्य होतं आणि खास आभार माझी पार्टनर विशाखा सुभेदार. आपल्या जोडीच्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे.” अशा प्रकारे त्याने इतरांचे देखील आभार मानले आहे.

या भेटवस्तूमुळे समीर चौगुले यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये. ही खास भेटवस्तू, लतादीदींच्या हस्तलिखितातील पत्र यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

समीर चौगुलेने अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्याने ‘विकून टाक’, ‘लव्ह लफडे’, ‘ए पेईंग होस्ट’, ‘आजचा दिवस माझा’, ‘कायद्याचे बोला’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. परंतु महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो ने त्यांना खास ओळख निर्माण करून दिली.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा