मिस युनिव्हर्स ही स्पर्धा नुकतीच पार पडली आहे. या स्पर्धेत अभिनेत्री आणि मॉडेल हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने मिस युनिव्हर्सचा ताज डोक्यावर घालून भारताचे नाव उंचावले आहे. हरनाजने वयाच्या केवळ २१व्या वर्षी तिची संपूर्ण जगात ओळख निर्माण केली आहे. भारतातील सर्व क्षेत्रातून तिचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तर सर्वत्र तिचे कौतुक चालले आहे. नुकतीच ७०वी मिस युनिव्हर्स स्पर्धा इस्त्रायलमध्ये संपन्न झाली. हरनाज सिंधू टॉप ३ मध्ये तिच्या हुशारीने आणि सौंदर्याने जागा बनवली.
उपांत्य फेरीत हरनाजने साऊथ आफ्रिका आणि पारागुआ या दोन देशातील स्पर्धकांना मात देऊन हा किताब जिंकला आहे. मिस युनिव्हर्स बनलेल्या हरनाज सिंधूने हा ताज जिंकला आणि सगळीकडे हरनाज हरनाज हे एकच नाव ऐकायला मिळत आहे. भारताने या आधी दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. चला तर जाणून घेऊया त्या दोन अभिनेत्रींबद्दल माहिती. (Harnaaz Kaur Sandhu, sushmita sen and lara dutta are miss univers of india)
सुष्मिता सेन (Susmita Sen)
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुष्मिता सेन हिने १९९४ साली मिस युनिव्हर्सचा किताब जिंकून भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवली होती. तिच्या या विजयाने संपूर्ण भारतात आनंद साजरा केला होता. या स्पर्धेत अनेक अभिनेत्रींनी आणि मॉडेलने भाग घेतला होता. परंतु सगळ्यांना मागे सारून अभिनेत्रीने विक्रमी विजय मिळवला होता. सुष्मिता सेन ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटात काम करून प्रेक्षकांच्या मनात तिचे स्थान निर्माण केले आहे. तिने ‘मै हू ना’, ‘बिवी नंबर वन’, ‘मैने प्यार क्यू किया’, ‘चिंगारी’, ‘सिर्फ तुम’, ‘दुल्हा मिल गया’, ‘ नो प्रॉब्लेम’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
लारा दत्ता (Lara Dutta)
लारा दत्ता हिने देखील मिस युनिव्हर्सचा मान पटकावून २००० साली भारताची मान उंचावली. ती देखील एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. बॉलिवूडमध्ये तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिने मिस युनिव्हर्स झाल्यानंतर ती चांगलीच नावारुपाला आली. तिने २००३ साली ‘अंदाज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या नंतर तिला अनेक ऑफर आल्या. त्यानंतर तिने ‘पार्टनर’, ‘सिंग इज ब्लिंग’, ‘भागम भाग’, ‘डॉन २’, ‘हाऊसफुल’, ‘बिल्लू’, ‘बेल बॉटम’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा :