भारताच्या हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्स २०२१ चे विजेतेपद जिंकले आणि संपूर्ण देशाने तब्ब्ल २१ वर्षांनी हा आनंद अनुभवला. हरनाज सिंधूने वयाच्या केवळ २१ व्या वर्षी यशाचे शिखर गाठले आहे. हरनाज सिंधू ही पंजाबची राहणारी असून, २१ वर्षाचा हा कठीण प्रवास संपवून हरनाज सिंधूने हा मुकुट जिंकला. आज हरनाजचा तिच्या कुटुंबीयांसोबतच संपूर्ण देशाला खूप अभिमान वाटत आहे. नुकतेच १२ डिसेंबर रोजी इस्त्राईलमध्ये ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा झाली. मिस युनिव्हर्सचे विजेतेपद भारतात येण्याची ही तिसरी वेळ आहे.
सर्वत्र फक्त आणि फक्त हरनाज आणि तिने जिंकलेल्या मुकुटाचीच चर्चा आहे. प्रत्येकाला या डायमंड क्राऊनबद्दल जाणून घ्यायचे आहे. मिस युनिव्हर्स झालेल्या व्यक्तीला मौल्यवान मुकुटासोबतच इतर अनेक बक्षिसे आणि इतर अनेक सुख सुविधा दिल्या जातात. मिस युनिव्हर्स २०२० आंद्रेया मेजाने हरनाज सिंधूच्या डोक्यावर एक सुंदर मुकुट चढवला. या मुकुटाची किंमत, त्यात असलेल्या हिरे, मिस युनिव्हर्सला मिळणाऱ्या बक्षिसांची रक्कम या सर्वांबद्दल जाणून घेऊया.
दरवर्षी मुकुट वेगळा असतो
हरनाज सिंधूचा मुकुट सुश्मिता सेन आणि लारा दत्ता यांच्या पेक्षा अगदी वेगळा आहे. हा मुकुट प्रत्येक वेळी बदलत असतो. तो पूर्वी पेक्षा जास्त खास आणि आकर्षक बनवला जातो. आता या मुकुटाबद्दल बोलायचे झाले तर २०१९ मध्ये मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या नवीन ज्वेलर मौआवाड दागिन्यांनी तयार केलेला मौवाड पावर ऑफ युनिटी क्राऊन (mouawad jewelry mouawad power of unity) आहे.
मुकुटाची किंमत ५ मिलियन असते
या मौल्यवान मुकटाची किंमत पाच मिलियन अमेरिकन डॉलर आहे जी भारतीय चलना नुसार ३७, ८७,९०,००० रुपयां पेक्षा जास्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा सर्वात महागडा मुकुट आहे. हा मुकुट २०१९ मध्ये झोझिबिनी टूझी दक्षिण आफ्रिका, २०२० मध्ये मेस्कीकोची अँड्रिया मेजा आणि आता मिस युनिव्हर्स २०२१ हरनाज सिंधूच्या डोक्यावर शोभून दिसत आहे.
मुकुटामध्ये निसर्गाची प्रतिमा आहे
मिस युनिव्हर्सच्या डोक्यावर सजलेल्या या मुकुटाची रचना १८ कॅरेट गोल्ड १,७७० डायमंड ६२.८३ कॅरेट वजन आहे या सर्वांपासून तयार करण्यात आले आहे. मुकुटामधील पाने पाकळ्या आणि वेलींची डिझाईन सात खड्यांच्या समुद्राच्या प्रतिमेचे प्रतिनिधित्व करते. हा मुकुट निसर्ग, सौंदर्य, स्त्रीत्व आणि एकताचे प्रतीक आहे.
मिस युनिव्हर्स विनरची बक्षिसाची रक्कम
मिस युनिव्हर्सने प्राईज रक्कम उघड केली नाही. मात्र हे लाखो रुपयांचे बक्षीस असल्याचे सांगितले जाते. मिस युनिव्हर्सला न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये एक वर्ष रहाण्याची परवानगी असते. त्यांना तिकडे राहण्याची सर्व सुविधा वाहतूकसुद्धा पुरवली जाते.
मिस युनिव्हर्सला या सर्व सुविधा मिळतात
मिस युनिव्हर्सला असिस्टंट आणि मेकअप आर्टिस्टची टीम दिली जाते. मेकअप, हेअर प्रॉडक्ट, शूज, कपडे, दागिने, एससी केअर यांना एक वर्ष वापरण्यास परवानगी दिली जाते. मॉडलिंग मध्ये संधी देणाऱ्याच्या उद्देशाने उत्तम फोटोज पोर्टफोलिओ बनवण्यासाठी बेस्ट फोटोग्राफर पण दिला जातो.
मिस युनिव्हर्सला सर्व सुविधा तर मिळतेच त्याच बरोबर त्यांच्यावर अनेक मोठ्या जबाबदार देखील असतात. त्यांना विविध इवेंट्स ,पार्टी आणि चॅरिटी प्रोग्रामला, प्रेस कॉन्फरन्सला मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनची प्रतिनिधी म्हणून आणि प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावावी लागते.
हेही वाचा –
शर्टलेस होऊन उणे एक तापमानात धावला टायगर श्रॉफ, दिशा पटानीने व्हिडिओवर केलेली कमेंट होते व्हायरल
एन्ट्रीचा सुंदर फोटो शेअर करत कॅटरिनाने लिहिली भावनिक नोट; म्हणाली, ‘आम्ही बहिणी नेहमी…’