सोनी सब वरच्या तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका मागच्या १३ वर्षांपासून अविरत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा हा शो आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका ही रसिकांच्या जवळची झाली आहे. अनेक सामाजिक विषयांवर विनोदी पद्धतीने डोळ्यात अंजन घालण्याचे काम या मालिकेतून होत असते.
मालिकेतील जेठया म्हणजे ह्या मालिकेचा श्वास आहे. जेठालाल हे नाव उच्चारले तरी चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहत नाही. गुजराती, जलेबी फाफडा खाणारा, रंगबेरंगी शर्ट घालणारा, छोटी मिशी असणारा आणि मुख्य म्हणजे बबितावर लाईन मारणारा हा जेठया सर्वानाच आवडतो.
नेहमी बबिताला इंप्रेस करायचा प्रयत्न करणाऱ्या या कच्छी माडू जेठयाने ह्यावेळेस तर चक्क नो बॉलवर सिक्सर मारला आहे. बबिताचा दिवाना असलेल्या जेठालालने ह्या वेळेस तर बबिताला आय लव्ह यू म्हणूनच टाकले आहे. अनेक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेली ही गोष्ट अखेर जेठयाच्या तोंडावर आली आहे. त्याने बबिताला एकदा नाही तर तीनदा आय लव्ह यू म्हटले आहे.
नेहमी बबिताच्या समोर चांगले वागणारा आणि तिला इंप्रेस करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या जेठयाने एवढ्या वर्षांपासूनच्या त्याच्या भावना बबितासमोर व्यक्त केल्या आहेत.
मालिकेच्या सध्याच्या ट्रकमध्ये जेठालाल बबिताला आय लव्ह यू म्हणतो हे बापूजी ऐकतात, जेठया असे बोलत असूनही बबिता एवढी शांत कशी आणि आपला मुलगा हे काय बोलतोय हे ऐकून बापूजी चिडतात आणि ओरडत त्याला छडीने मारू लागतात. आता जेठयाचा हा कबुलीनामा खरा आहे की स्वप्न हे तर आपल्याला मालिकेच्या येत्या भागात समजेलच.