संजय दत्त म्हणजे बॉलीवूडमधील वजनदार नाव. बाबा म्हणून प्रसिद्ध असणारा संजय त्याच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चित राहिला. संजय दत्त म्हणजे बॉलीवूडमधील चांगल्या आणि वाईट दोन्ही कारणांमुळे प्रसिद्ध आहे. संजयचे आयुष्य म्हणजे आम पासून खासपर्यंत सर्वांसाठीच खुली ‘किताब सारखे आहे. त्याच्या आयुष्यात एखाद्या चित्रपटालाही लाजवतील अशा अशा घटना घडल्या आहेत. त्यातल्या काही महत्वाच्या घटनांवर आधारित संजू हा सिनेमा देखील तयार झाला. अतिशय चढ उतारांनी भरलेले आयुष्य त्याचे आयुष्य नेहमीच लोकांच्याही चर्चेचा विषय होते.
संजयच्या आयुष्यात असंख्य मुली आल्या, सिनेसृष्टीशी निगडीतही आणि या क्षेत्राबाहेरीलही. संजयने त्याच्या आयुष्यात तीन लग्न केले. त्याच्या आयुष्यातले पहिले लग्न त्याने रिचा शर्मा या अभिनेत्रींसोबत केले होते. आज या लेखातून आम्ही संजयचा या लग्नाशी आणि त्याच्या आणि रिचाच्या मुलीशी त्रिशालाशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत.
संजय दत्तला त्याच्या पहिल्या पत्नीपासून म्हणजेच रिचापासून एक मुलगी झाली. त्या मुलीचे नाव त्रिशाला. त्रिशालाचा जन्म १९८८ साली झाला. सध्या त्रिशाला परदेशात असते. मात्र ती लहान असतानाचा एक किस्सा त्यावेळी खूपच चर्चेत आला होता. तो म्हणजे त्रिशालाने एकदा संजय दत्तला बाबा म्हणण्याऐवजी काका म्हटले होते. हे ऐकून संजय दत्त भयंकर चिडला. तेव्हा आलेल्या काही बातम्यांनुसार या घटनेनंतर संजय त्याच्या पत्नी रिचावरही खूप चिडला आणि तिने त्रिशालाला चांगले संस्कार केले नसल्याचा आरोप करत तो तिच्यासोबत खूप भांडला देखील.
संजय आणि रिचा यांची पहिली भेट ही एका सिनेमाच्या मुहुर्तावेळी झाली. त्यानंतर त्यांच्यात ओळख झाली आणि कालांतराने ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १९८७ साली या दोघांनी लग्न केले. १९८८ साली त्यांच्या पहिल्या मुलीचा त्रिशालाचा जन्म झाला. त्यानंतरचा काही काळ उत्तमाचा गेला, आणि एक दिवस अचानक रिचाला ब्रेन ट्युमर झाल्याचे समजले. तिच्या त्याच्या उपचारासाठी परदेशात गेली. रिचा परदेशात गेल्यावर संजय दत्त आणि माधुरी दीक्षित जवळ येऊ लागले. त्यांच्या अफेयरच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरल्या आणि याचमुळे संजय आणि रिचा यांच्यात दुरावा निर्माण झाला.
रिचाची बहीण एनाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, जेव्हा माधुरी आणि संजयच्या अफेयरच्या बातम्या आल्या तेव्हा रिचा संजयला भेटायला भारतात आली होती, पण संजय तिला घ्यायला एअरपोर्टवर देखील गेला नाही. दरम्यान ब्रेन ट्युमरसोबत चाललेल्या लढाईत रिचाने १० डिसेंबर १९९६ ला या जगाचा निरोप घेतला.
कामाबद्दल बोलायचं झालं तर संजय दत्त लवकरच प्रदर्शित होणाऱ्या KGF Chapter २ मध्ये अधीरा ही भूमिका साकारताना दिसणार आहे. ह्या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खूप जास्त उत्सुकता आहे.