मराठी रंगभूमीवर बालगंधर्व म्हणजेच नारायण श्रीपाद राजहंस यांच्या स्त्री वेषातील भुमिका प्रचंड गाजल्या. किंबहुना त्यांनी एक कलेचा नवा पाठच अभिनय क्षेत्रात घालून दिला.
त्यानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलावंतांनी अनेकदा पडद्यावर स्त्री पात्र साकारलं. त्यातील अनेक पात्र प्रेक्षकाच्या स्मरणात देखील आहेत. अगदी अलिकडच्या काळातच ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट आणि त्यातील सचिन पिळगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्त्री भुमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या.
आज या प्रकरणी चर्चा करण्याचे कारण म्हणजे, नुकताच मराठी चित्रपट सृष्टीतील सध्याचा एक प्रसिद्ध अभिनेता असलेला स्वप्नील जोशी याने शेअर केलेला स्त्री वेषातील फोटो.
अभिनेता स्वप्निल जोशी हा नेहमीच काही ना काही ट्रेंड फॅालो करत असतो. अलीकडे आलेले बाटली कॅप चॅलेंज असो नाहीतर वृद्ध किंवा महिला फिल्टर वापरण्याची सध्याची क्रेझ असो. या कारणांमुळे स्वप्नील नेहमी चर्चेत असतो.
सध्या स्वप्नीलचा असाच एक फोटो व्हायरल होत आहे. यात मात्र स्वप्नीलचं नवीनच रुप प्रेक्षकांच्या समोर आले आहे. स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये स्वप्नीलने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे.
हा लुक त्याने ‘तेरे घरच्या समोर’च्या आठवणीत केला होता. या मालिकेत त्याने एका स्त्रीची भुमिका साकारली होती. या मालिकेतील आठवणी सोशल मीडियावर शेअर करत तो म्हणाला, ”तेरे घरच्या समोर ही मालिका करताना दिग्गज कलाकारांकडून बरंच काही शिकता आलं. हा अनुभव समृद्ध करून गेलाय.’
‘स्त्री भुमिका साकारणं, ‘ती’ होणं खरंच सोपं नाही. ‘ती’ जखमांचं गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पुर्ण कराण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अशा प्रत्येक ‘ती’च स्वप्न पुर्ण करायला shop with ti तयार आहे.’
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘रामायणा’त ‘ही’ महत्त्वाची भूमिका साकारून स्वप्नीलने लहाणपणीच वेधलं होतं प्रेक्षकांचं लक्ष, वाचा त्याचा सिनेप्रवास
मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ ५ किसींग सीनने घातली प्रेक्षकांना भुरळ