झी मराठीवर चालू असणाऱ्या सगळ्या मालिका खूप लोकप्रिय आहेत. यातील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि हवं‘ ही मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा मिळवली आहे. मालिकेची कहाणी खूप वेगळी आहे. आताच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती लुप्त होत आहे. त्यामुळे मालिकेत कुठेतरी या सगळ्या एकत्र कुटुंबाच्या गमतीजमती आणि सगळे नातेवाईकांमधील प्रेम पाहायला मिळत आहे. मालिकेत अमृता पवार आणि हार्दिक जोशी हे मुख्य भूमिकेत आहेत. ते दोघेच नव्हे तर मालिकेची कहाणी कुटुंबातील सगळ्या व्यक्तींभोवती फिरते. अशातच अदिती आणि सिद्धार्थच्या लग्नाची गडबड चालू आहे.
अदिती आणि सिद्धार्थचे लग्न मोठ्या थाटामाटात पार होणार आहे. मालिकेत गावाकडच्या पद्धतीने लग्नसोहळा होणार आहे. लग्नाआधीचे आणि नंतरचे सगळे समारंभ या मालिकेत दाखवले जाणार आहे. मालिकेचे प्रोमो आणि लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. दोघेही पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे. (tujya majya sansarala aani kay hav wedding picture’s viral on social media)
मराठी टेलिव्हिजनवरील हे पहिले लग्न असेल, ज्यात सगळे विधी दाखवले जाणार आहे. मेहेंदी, हळद, चुडा, जेवण यांसारखे सगळे कार्यक्रम दाखवणार आहेत. त्यामुळे आता हा लग्न विशेष भाग बघण्यासाठी सगळे प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. अदिती आणि सिद्धार्थने देखील त्यांच्या लग्नाची खूप वाट बघितली आहे. अनेक संकटांचा सामना करत ते अखेर त्यांच्या लग्नाच्या प्रवास पर्यंत पोहचले आहेत.
हार्दिकने या आधी झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत काम केला आहे. मालिकेत त्याच्यासोबत अक्षया देवधर मुख्य भूमिकेत होते. मालिकेत त्याचे राणा नावाचे पात्र खूप गाजले होते. या मालिकेत त्याला काही प्रमाणात मॉर्डन दाखवले आहे. त्याच्या चाहत्यांना त्याला या भूमिकेत देखील खूप सहजतेने स्वीकारले. अमृताने या आधी ‘ललित २०५’, ‘स्वराज जननी जिजामाता’ आणि ‘दुहेरी’ या मालिकांमध्ये काम केले आहे.