छोट्या पडद्यावर झळकत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खानने मोठ्या पडद्यावरही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. हिनाला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही. अभिनयाव्यतिरिक्त हिना सोशल मीडियावरही कमालीची सक्रिय असते. आता हीच हिना सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. काही दिवसांपूर्वीच ती तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयसवालसोबत नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी न्यूयॉर्कला रवाना झाली होती. दरम्यान ती तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.
तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर ती एकापेक्षा एक सुंदर पोझ देत फोटो काढताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. हिनाचा हा लूक प्रेक्षकांना खूप आवडताना दिसतोय. तिचा हा लूक प्रत्येक चाहत्याचे मन जिंकत आहे. हिना या लूकमध्ये मोहक आणि आकर्षक दिसत आहे.
हिनाने काही तासांपूर्वीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक लाईक मिळाले आहेत. इंस्टाग्राम हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या ट्रेंडिंगवर आहे. हिनाचे इंस्टाग्रामवर १५.८ मिलियन चाहते आहेत.
हिनाच्या कारकिर्दीची सुरुवात हिंदी मालिकेपासून झाली. स्टार प्लसवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला खूप ओळख मिळाली. या मालिकेत ती ‘अक्षरा’ हे पात्र निभावत होती. त्यानंतर तिने ‘कसोटी जिंदगी की’मध्ये ‘कोमॉलिका’ ही व्यक्तीरेखा साकारली.
त्याचबरोबर ‘फियर फॅक्टर- खतरों के खिलाडी ८’, ‘बिग बॉस ११’ या रियॅलिटी शोमध्ये ती रनरअप आली. त्यानंतर तिने काही पंजाबी म्युझिक अल्बममध्येही काम केले. विशेष म्हणजे हिनाने छोट्या पडद्यासोबतच रुपेरी पडद्यावरही आपल्या अभिनयाची कमाल दाखवलीय. ती २०२० साली आलेल्या ‘हॅक्ड’ या सिनेमात दिसली होती. यामध्ये तिच्यासोबत रोहन शाह आणि सिड मक्कर यांच्याही भूमिका होत्या.