Sunday, April 20, 2025
Home मराठी ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडताच विशाल-विकास जोडीने घेतले जोतिबाचे दर्शन, पाहा व्हिडिओ

‘बिग बॉस मराठी’चे तिसरे पर्व जोरात पार पडले आहे. गेले दोन वर्ष कोरोनामुळे बिग बॉसचे पुढचे पर्व चालू झाले नव्हते, त्यामुळे सगळ्या प्रेक्षकांना या पर्वाची आतुरता लागली होती. सप्टेंबर महिन्यात हा शो चालू झाला आणि हा हा म्हणता या शोने प्रेक्षकांच्या मनात आणि टीआरपीच्या यादीत उच्च स्थान मिळविले. अशातच या शोचा ग्रँड फिनाले झाला आहे. या शोमध्ये विशाल निकमने बाजी मारून या शोचे विजेतेपद पटकावले आहे.

घरात असल्यापासूनच विशालने त्याच्या गोड आणि समंजस स्वभावाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले होते. त्याचा खेळ असो, मित्र मैत्रिणींसोबत वागणे असो किंवा घरातील इतर कोणतीही कामे असो त्याने प्रत्येक गोष्टीत प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ‘जोतिबा’ मालिकेतून घराघरात पोहचलेला हा विशाल सुरुवातीपासून प्रसिद्धीच्या झोतात होता. अशातच बिग बॉससारख्या मोठ्या शोमध्ये येऊन त्याच्या लोकप्रियतेत आणखीनच भर पडली. (Bigg boss Marathi 3 fame Vishal and vikas take bleessing of lord jotiba)

बिग बॉसच्या घरात असताना विशाल, विकास, सोनाली आणि मीनल या ग्रुपने सगळ्यांना त्यांच्या प्रेमात पडले. त्यांचे रुसवे-फुगवे, प्रेम, माया, भांडण या गोष्टी प्रेक्षकांना खास भावल्या. खास करून विशाल आणि विकासची मैत्री सर्वत्र गाजली. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यापासून ते एकमेकांसाठी टक्कल करण्यापर्यंत त्यांचा प्रवास सगळ्यांनी पहिला आहे. त्यांची जय-विरूची जोडी सगळ्यांना खूप आवडते.

अशातच बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर या जोडीने जोतिबाचे एकत्र दर्शन घेतले आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये ते दोघे ‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ म्हणताना दिसत आहे. तसेच त्यांच्या आजूबाजूला त्यांचे अनेक चाहते त्यांचे फोटो काढताना दिसत आहेत. त्यांच्यातील घराच्या बाहेर आल्यावर देखील ही मैत्री पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे.

हेही वाचा :

फोटोत दिसणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याचा सर्व अभिनेत्रींना वाटायचा हेवा, केवळ १९ व्या वर्षी झाले निधन

उर्वशी रौतेलापेक्षा जास्त तिची आई आहे ग्लॅमरस, स्टाईलिश फोटो पाहून युजर्स म्हणाले, ‘बहीण वाटतेय…’

गोविंदाला पाहून रणवीर सिंगच्या डोळ्यातून तरळले अश्रू; अभिनेता म्हणाला, ‘माझा देव…’

 

हे देखील वाचा