अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत शनिवारी (१ जानेवारी) नवीन वर्षाचे स्वागत स्वागत मोठ्या उत्साहात केले आहे. ज्याने त्याने आपआपल्या परीने नवीन वर्ष साजरे केले आहे. कलाकारांनी देखील पार्टी आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन नवीन वर्ष साजरे केले आहे. याचप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) अनोळखी ठिकाणी सुट्टीवर गेले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, ते कालच ट्रिपवरून परतले होते. रविवारी (२ जानेवारी) सकाळी हे कथित जोडपे दुसऱ्या सुट्टीसाठी निघाले आहे. राखाडी रंगाची पँट आणि हिरव्या रंगाच्या जॅकेटसह पांढऱ्या टीशर्टमध्ये सिद्धार्थला विमानतळावर स्पॉट केले.
कियारा पांढऱ्या टी-शर्ट आणि फेंट निळ्या रंगाच्या शॉर्ट्समध्ये दिसली. दोघांनी मास्क घातले होते. यावेळी देखील त्यांच्या डेस्टिनेशनबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु असे दिसते आहे की, ते एकत्र आणखी काही स्पेशल वेळ घालवतील.
कियारा आणि सिद्धार्थ २०२१ मध्ये गेले होते मालदीवला
कियारा आणि सिद्धार्थ २०२१ मध्ये नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मालदीवला गेले होते. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले. काही आठवड्यांपूर्वी काही माध्यमांतील वृत्तामध्ये असे सांगण्यात आले होते की, सिद्धार्थ आणि कियारा लवकरच त्यांचे नाते अधिकृत करू शकतात.
‘शेरशाह’ चित्रपटात दिसली सुंदर केमिस्ट्री
कामाबद्दल बोलायचे झाले, तर कियारा आणि सिद्धार्थने ‘शेरशाह’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. या चित्रपटातील त्यांच्या शानदार केमिस्ट्रीने सर्वांनाच प्रभावित केले. जर त्यांनी पुष्टी केली की, ते रिलेशशिपमध्ये आहेत, तर ही आश्चर्यचकित करणारी बाब नाही.
सिद्धार्थ मल्होत्रा अनेक चित्रपटांचा आहे भाग
काही दिवसांपूर्वी कियाराने वरुण धवन, अनिल कपूर आणि नीतू कपूर यांच्यासोबत तिच्या आगामी ‘जुग जुग जियो’ चित्रपटाचे आंतरराष्ट्रीय शूटिंग शेड्यूल पूर्ण केले. दुसरीकडे, सिद्धार्थ ‘मिशन मजनू’, ‘थँक गॉड’ आणि ‘योद्धा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा-