कोरोनाच्या काळात बॉलिवूडची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. असे अनेक चित्रपट आहेत जे वेळेवर प्रदर्शित होऊ शकले नाहीत. असे अनेक चित्रपट आहेत जे प्रदर्शित झाले. पण त्यांची कमाई अपेक्षेपेक्षा थोडी कमी होती. याचा फायदा साऊथ आणि हॉलिवूड चित्रपटांना झाला. काही काळापूर्वी ‘स्पायडरमॅन नो वे होम’ हा हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. या चित्रपटाने २९० कोटींहून अधिक कमाई केली असून, अशी कमाई करणारा हा केवळ तिसरा हॉलिवूड चित्रपट आहे.
भारतीय चाहत्यांचे केले भरपूर मनोरंजन
कोरोनाच्या काळात जिथे बॉलिवूड चित्रपटांना त्यांची किंमत वसूल करण्यात अडचणी येत आहेत. तिथे ‘स्पायडरमॅन’ सीरिजच्या नवीन चित्रपटाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही या चित्रपटाने आपल्या विलक्षण कमाईने सर्वांना चकित केले आहे. ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे ताजे आकडे शेअर केले आहेत. तरणच्या ट्वीटनुसार, चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडमध्ये एकूण १२.१५ कोटींची कमाई केली आहे. शुक्रवारी (३१ डिसेंबर) चित्रपटाचे कलेक्शन ३ कोटी होते. शनिवारी (१ जानेवारी) स्पायडरमॅनने ४.९२ कोटी आणि रविवारी (२ जानेवारी) ४.७५ कोटींची कमाई केली. त्यानुसार, तीन आठवड्यांत या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर २०२.३४ कोटींची कमाई केली.
#SpiderMan hits ₹ 200 cr… Restrictions + #PushpaHindi [mass circuits] + #83TheFilm [metros] are speed breakers, but #NewYear holidays + open week prove advantageous in Weekend 3… [Week 3] Fri 3 cr, Sat 4.92 cr, Sun 4.75 cr. Total: ₹ 202.34 cr Nett BOC. #India biz. pic.twitter.com/oA6CqCpwuy
— taran adarsh (@taran_adarsh) January 3, 2022
TOP 3 HOLLYWOOD FILMS IN INDIA…
⭐️ [2019] #AvengersEndgame: ₹ 367.43 cr
⭐️ [2018] #AvengersInfintyWar: ₹ 228.50 cr
⭐️ [2021] #SpiderMan: #NoWayHome: ₹ 202.34
Coincidentally, THE TOP 3 are #Marvel films.
Note: #English #Hindi #Tamil #Telugu
Nett BOC. #India biz. pic.twitter.com/lLaiB4t4T6— taran adarsh (@taran_adarsh) January 3, 2022
भारतातील टॉप ३ हॉलिवूड चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, पहिला क्रमांक २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ॲव्हेंजर्स एंडगेम’ या चित्रपटाचा येतो. या चित्रपटाने भारतात ३६७.४३ कोटींची कमाई केली होती. त्याचवेळी ‘अॅव्हेंजर्स’चे दोन नंबरवर इन्फिनिटी वॉर होते. या चित्रपटाने २२८.५० कोटींची कमाई केली होती. सर्वात मोठा योगायोग म्हणजे हे तीन सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट #Marvel चे आहेत.
‘स्पायडरमॅन’चा धमाकेदार जलवा
‘स्पायडरमॅन नो वे होम’चे दिग्दर्शन जॉन वॉट्स यांनी केले आहे. या चित्रपटात टॉम हॉलंड, टोबे मॅग्वायर, गेंडारा, मारिसा टोमी, अँड्र्यू गारफिल्ड आणि अल्फ्रेड मोलिना यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या चित्रपटासोबतच प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा’ या दक्षिण भारतीय चित्रपटालाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. याच काळात बॉलिवूडचा बिग बजेट चित्रपट ‘८३’ही प्रदर्शित झाला. मात्र यानंतरही स्पायडरमॅनची कमाई थांबली नाही आणि यश मिळवले. आता हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतो की, नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण यासाठी आता ‘स्पायडरमॅन’ला २६ कोटींहून अधिक कमवावे लागणार आहेत.
हेही वाचा :
डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत
दहा वर्षांपूर्वी ‘अशी’ दिसायची सुपरबोल्ड निया शर्मा, फोटोमध्ये ओळखनेही आहे कठीण!
आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र










