टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त शोपैकी एक असलेला ‘बिग बॉस’ हा रियॅलिटी होय. या शोमध्ये सतत कोणाचे ना कोणाचे वाद होताना पाहायला मिळतात. ‘बिग बॉस १५’ च्या घरात आज टिकीट टू फिनाले दरम्यान, अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) आणि देवोलीना भट्टाचार्जी (Devolina Bhattacharjee) यांच्यात जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके वाढले की, नॅशनल टीव्हीवर देवोलीना अभिजितला म्हणाली की, ती त्याला चप्पलने मारेल. देवोलीना आणि अभिजीतमधील भांडणाचे कारण प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal) आहे. टिकीट टू फिनालेदरम्यान, खुर्चीवर बसलेल्या शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि प्रतीक सहजपालच्या एक्सप्रेशनमध्ये बदल घडवून आणण्याचे काम कुटुंबीयांना देण्यात आले होते.
या टास्कदरम्यान अभिजीत शमिताला कॉन्स्टिपेशनची शिकार आणि प्रतीकवर तिची कॉन्स्टिपेशन टेस्ट करण्यासारख्या वाईट अनेक गोष्टी बोलला. या गोष्टी ऐकून प्रतीक आणि देवोलीनाला राग आला. तेव्हा अभिजीतने वडिलांबद्दल अशा काही गोष्टी बोलल्या, ज्यामुळे देवोलीनाला त्याचा खूप राग आला आणि तिने अभिजीतला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या शिव्या ऐकून अभिजीतही पुढे आला आणि त्याने देवोलीनावर हात उचलला.
बिग बॉसने दिला इशारा
या भांडणात रश्मी देसाई, निशांत भट्ट यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा करण कुंद्राने देवोलीनाला बाहेर काढले. यादरम्यान बिग बॉसने घरातील सदस्यांना या भांडणात कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी, असे वारंवार जाहीर केले. पण अभिजीत आणि देवोलीना दोघेही बिग बॉसचे ऐकण्यासाठी तयार नव्हते. देवोलीना चिडून अभिजीतला म्हणाली की, “मी तुला चप्पल मारेन.”
देवोलिना आणि अभिजीत पुन्हा मैत्री करणार का?
अखेरीस बिग बॉसने जाहीर केले की, सध्या घरात कोणीही काही बोलणार नाही. बिचुकले बेडरूमच्या परिसरात राहिल्यास देवोलीना बाहेर बागेच्या परिसरात जाईल. बागेच्या परिसरात प्रतीकने देवोलीनाला शांत केले. बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांना या संपूर्ण भांडणात अजिबात भाग घ्यायचा नव्हता. कारण त्यांनी सांगितले की, ते दोघेही इतक्या भांडणानंतर पुन्हा एकत्र येतील आणि दोन दिवसांनंतर देवोलिना पुन्हा बिचुकलेचे कपडे धुताना दिसणार आहे.
हेही वाचा-