Monday, August 4, 2025
Home बॉलीवूड मिलिंद सोमणचा देसी अंदाज वेधतोय सर्वांचे लक्ष, पगडीतील फोटो पाहून तरुणींच्याही काळजात वाजली घंटी

मिलिंद सोमणचा देसी अंदाज वेधतोय सर्वांचे लक्ष, पगडीतील फोटो पाहून तरुणींच्याही काळजात वाजली घंटी

बॉलिवूडचा ‘हँडसम हंक’ मिलिंद सोमण या अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाने तसेच फिटनेसने सर्वांनाच घायाळ केले आहे. मिलिंदची खास गोष्ट म्हणजे वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्याने त्याच्या फिटनेस आणि देखण्या व्यक्तिमत्त्वावर खूप मेहनत घेतली आहे. यासोबतच त्याने त्याच्या आहारावरही खूप काम केले आहे. तो एक जबरदस्त ॲथलिट आहे आणि हेच त्याला इतरांपेक्षा वेगळे बनवतो.

मिलिंदचा देसी अंदाज
मिलिंद (Milind Soman) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो आणि चाहत्यांशी संवाद साधत असतो. त्याला त्याची पत्नी अंकितासोबत आउटिंग आणि ॲडव्हेंचर करायला आवडते. अलीकडेच मिलिंदने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो जैसलमेरमधील आहेत. पहिल्या फोटोमध्ये तो शर्टलेस दिसत आहे. त्याने जैसलमेरची खास लाल पगडीही घातली आहे. त्याचा हा फोटो पाहून चाहते त्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

दुसरीकडे, त्याच्या दुसऱ्या फोटोबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा स्वॅग आणखी वेगळा आहे. या फोटोमध्ये तो काळ्या रंगाच्या डेनिम शर्टमध्ये दिसत आहे. त्याने पगडीसह सनग्लासेस लावले असून, तो मोबाईलकडे पाहताना दिसत आहे. फोटो शेअर करण्यासोबतच मिलिंदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “जेव्हा जैसलमेरचा सूर्य असतो, तेव्हा या पगडीपेक्षा स्टायलिश काहीही असू शकत नाही. मी पारंपारिक अंदाज घातला आहे की नाही?”

मिलिंदचे होत आहे कौतुक
चाहत्यांनी मिलिंदच्या या पोस्टला खूप पसंती दिली आहे आणि त्याच्या या अंदाजाची प्रशंसा केली आहे. विशेषत: मुली त्याला हँडसम आणि स्मार्ट म्हणत आहेत. अनेकांचा असा विश्वास आहे की, वाढत्या वयाबरोबर तो अधिकाधिक तरुण होत आहे. त्याची पत्नी अकिंता कोनवर हिने देखील या फोटोंवर कमेंट केली आहे. तिने लिहिले की, “अरे!!!!!.” यासह तिने फायर ईमोजी देखील टाकले आहेत. नवीन वर्षाच्या दिवशीही मिलिंदने त्याची पत्नी अंकितासोबत एक फोटो शेअर केला आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या होत्या.

अंकिता आणि मिलिंद यांनी २०१८ साली लग्न केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या वयात २५ वर्षांचे अंतर आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा