Friday, October 31, 2025
Home बॉलीवूड वयाच्या 16 व्या वर्षी केली मॉडेलिंगमधून सुरुवात, दीपिका पदुकोण आज आहे निर्मिती क्षेत्रात कार्यरत

वयाच्या 16 व्या वर्षी केली मॉडेलिंगमधून सुरुवात, दीपिका पदुकोण आज आहे निर्मिती क्षेत्रात कार्यरत

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अगदी कमी वयात त्यांच्या करीअरला सुरुवात केली. परंतु त्यांनी याच वयात अनेक अभिनेत्रींना मागे सारून बॉलिवूडमध्ये त्यांची खास ओळख निर्माण केली. याच यादीतील एक अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. आज दीपिका बॉलिवूडमधील एक टॉप अभिनेत्री आहे. अनेक गाणी, चित्रपटात काम करून तिने तिचे एक स्वतंत्र आणि खास स्थान निर्माण केले आहे. दीपिका गरुवारी (5 जानेवारी ) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास माहिती.

दीपिकाचा जन्म 5 जानेवारी 1986 मध्ये झाला. दीपिकाने वयाच्या केवळ 16 व्या वर्षी मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले. करिअरच्या सुरुवातीला तिने अनेक मॉडेलिंग असाईमेंटमध्ये काम केले होते. 2007 साली मात्र तिचे नशीब चमकले आणि तिला बॉलिवूडमधून ऑफर आली. तिला पहिल्याच चित्रपटात थेट बॉलिवूड किंग खान शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळाली. तिने 2007 साली ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने जरी ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असेल, तरी देखील त्याआधी ती 2006 मध्ये हिमेश रेशमियाचा अल्बम ‘नाम है तेरा’ मध्ये दिसली होती. तसेच याच वर्षी तिने कन्नड चित्रपट ‘ऐश्वर्या’ मध्ये काम केले होते. (Deepika padukone celebrate her birthday let’s know about her life)

यानंतर तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले. तिने ‘बचना ए हसीनो’, ‘चांदणी चौक टू चायना, ‘बिल्लू’, ‘हाऊसफुल’, ‘हॅप्पी न्यू इअर’, ‘पद्मावत’, ‘बाजीराव मस्तानी’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये तिची ओळख निर्माण केली. यानंतर दीपिकाने हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. तिने विन डिझन यांचा चित्रपट ‘एक्सएक्सएक्स रिटर्न ऑफ जेंडर केज’मध्ये काम केले होते. हॉलिवूडधील पहिल्याच चित्रपटाने तिने धमाल केली होती.

अभिनयानंतर दीपिकाने निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. तिचा नुकताच ’83’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती दीपिकाने केली आहे. या चित्रपटात तिचा पती रणवीर सिंह मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 1983 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपवर आधारित आहे. खास करून खेळाडू कपिल देव याच्यावर हा चित्रपट आधारित आहे.

दीपिका पदुकोण तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील जोरदार चर्चेत राहिली आहे. रणबीर कपूर सोबतचे तिचे रिलेशन खूप गाजले होते. परंतु काही कारणांनी त्यांचा ब्रेकअप झाला. त्यानंतर 2018 मध्ये तिने रणवीर सिंगसोबत लग्न केले आहे. त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांना खूप आवडते. (deepika padukone celebrate her birthday lets know about her life)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
दीपिका पदुकोणला वयाच्या १८व्या वर्षी ब्रेस्ट इम्प्लांटचा दिला होता सल्ला, अभिनेत्रीने म्हणाली ‘सर्वात वाईट…’

जेव्हा दीपिका पदुकोणला वापरावे लागले होते पुरुषांचे घाणेरडे बाथरूम, स्वत:च सांगितली संपूर्ण हकीकत

हे देखील वाचा