साल 2021 हे वर्ष बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झासाठी (Dia Mirza) खूप खास आणि भावनिक क्षणांनी भरलेले होते. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला जिथे तिने बिझनेस मॅन वैभव रेखीशी दुसरे लग्न केले होते. त्याच वेळी वर्षाच्या मध्यात मुलगा अव्यानला जन्म देऊन ती आई झाली. अभिनेत्रीच्या आयुष्यातील हे सर्व खूप खास असले, तरी तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला. एका मुलाखतीदरम्यान दिया मिर्झाने तिच्यासोबत घडलेल्या वेदनादायक घटनेबद्दल सांगितले आहे. तिने उघड केले की, आई बनणे तिच्यासाठी अजिबात सोपे नव्हते कारण तिच्या गरोदरपणात डॉक्टरांनी तिला मरता मरता वाचवले होते.
प्री-मॅच्युअर बाळाला दिला जन्म
दिया मिर्झाने 15 फेब्रुवारी 2021 रोजी वैभव रेखीसोबत लग्न केले. लग्नानंतर दिया मिर्झा हनीमूनसाठी मालदीवला गेली होती. लग्नाच्या 3 महिन्यांनंतर 14 मे रोजी दियाने प्री-मॅच्युअर बाळाला जन्म दिला. मुलगा झाल्यानंतर 2 महिन्यांनी तिने ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. मात्र, तिने 15 जुलै रोजी मुलाच्या जन्माची बातमी चाहत्यांसोबत शेअर करताना, तिने कोणत्या परिस्थितीत तिने बाळाला जन्म दिला हेही सांगितले. (dia mirza talked about how difficult her pregnancy and recalled her near death experience)
मरता मरता वाचलीय अभिनेत्री
दिया मिर्झाने सांगितले की, तिला गरोदरपणाच्या पाचव्या महिन्यात ऍपेन्डेक्टॉमीसाठी जावे लागले, त्यामुळे तिला खूप अडचणी आल्या. यानंतर, तिला बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे अनेकवेळा रुग्णालयात फेऱ्या माराव्या लागल्या. कारण गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात ते सेप्सिसचे रूप घेऊ शकते. या सर्व समस्या दियासाठी खूप वाईट होत्या. त्यामुळे ती मृत्यूशी झुंज देत होती. इतकेच नाही, तर दिया मिर्झाच्या नाळेतून रक्तस्त्राव सुरू झाल्याने, तिची प्रसूती होत असताना अडचणी वाढल्या होत्या. तो कठीण काळ होता, पण दिया मिर्झा आणि तिच्या बाळाला डॉक्टरांनी या संकटातून बाहेर काढत वाचवले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अभिनेता हा नेहमीच अभिनेता असतो, जबाबदारीचे ओझे निर्मात्याच्या खांद्यावर असते’ दिया मिर्झाचे मोठे वक्तव्य
मालिकेच्या सेटवर एकमेकांसोबत घालवला वेळ अन् पडले प्रेमात, 11 डिसेंबरला करणार लग्नाचा पहिला वाढदिवस