नोरा फतेही बॉलिवूडचा असा चेहरा बनली आहे, जिने आपल्या डान्सने चाहत्यांच्या मनावर छाप पाडली आहे. जेव्हाही नोरा एखाद्या गाण्यात दिसली आहे, ते गाणे सुपरहिट झाले आहे आणि तिच्या डान्सला चाहत्यांनी दाद दिली आहे. नोराचे डान्स व्हिडिओ युट्यूबपासून सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात. नोराचे नाव आजकाल प्रसिद्ध कोरिओग्राफर टेरेन्स लुईससोबत जोडले जात आहे. नोरा जेव्हापासून ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या डान्सिंग रियॅलिटी शोमध्ये दिसली आहे. तेव्हापासून टेरेन्स आणि तिच्याबद्दल काही ना काही बातम्या येत आहेत.
तसे शो दरम्यान खुद्द टेरेन्सने (Terence Lewis) देखील खुलासा केला आहे की, त्याला नोरा (Nora Fatehi) आवडते. जरी आतापर्यंत दोघांच्या प्रेमकथेची अशी कोणतीच गोष्ट समोर आलेली नाही. पण जेव्हा जेव्हा टेरेन्स आणि नोरा स्टेजवर एकत्र येतात, तेव्हा असे वाटते की, त्यांनी त्यांच्या हॉटनेसने आग लावली. पण जर तुम्हाला सांगितले की, टेरेन्ससोबत तुम्हाला नोरा किंवा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यापैकी कोणाची निवड करायची आहे, तर तुम्ही कोणाची निवड कराल? पण खऱ्या आयुष्यासाठी नाही. सध्या फक्त डान्सिंग पार्टनर म्हणून.
तुम्हीही गोंधळून गेला ना? चला तर मग आम्ही तुम्हाला थोडी मदत करू. आम्ही तुम्हाला नोरा, टेरेन्स आणि मलायका यांचा व्हिडिओ दाखवत आहोत. जेणेकरून तुम्ही तुम्ही ठरवू शकता की, टेरेन्सची केमिस्ट्री कोणाशी जास्त हॉट आणि सिझलिंग दिसते. तसे, मलायका आणि टेरेन्स देखील खूप चांगले मित्र आहेत. दोघेही त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एकमेकांचे डान्सचे व्हिडिओ शेअर करत असतात. आत्ता तुम्ही भारतातील सर्वोत्कृष्ट डान्सरचा हा व्हिडिओ पाहा ज्यामध्ये नोरा, टेरेन्स आणि मलायका ‘बँग बँग’ चित्रपटाच्या टायटल साँगवर डान्स करत आहेत. ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ हा नंबर १ डान्सिंग रियॅलिटी शो पैकी एक आहे. मलायका आणि टेरेन्ससोबत गीता कपूरही या शोचे परीक्षण करते.
नोराच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती सध्या उच्चांकावर आहे. अलिकडेच ‘भुज – द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातील तिची भूमिका चाहत्यांना खूप आवडली होती. तसेच या चित्रपटात अजय देवगण तिच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसला. एवढेच नाही, तर नोरावर चित्रित केलेली गाणी सुपरहिट होत आहेत. तिची फॅन फॉलोविंग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. नोराने ‘दिलबर’ आणि ‘गर्मी’ सारख्या गाण्यांनी आपली खास ओळख निर्माण केली आहे. नोरा ‘बिग बॉस’च्या घराचाही एक भाग राहिली आहे.
हेही वाचा :