टेलिव्हिजन क्षेत्रात मालिकांपेक्षा जास्त रियॅलिटी शोची चलती आहे. एका मागोमग एक असे अनेक थोड्याफार फरकाने एकसारखेच शो आपल्याला सतत टीव्हीवर पाहायला मिळतात. रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक आणि त्यांच्यात असणाऱ्या कलागुणांचे थेट दर्शन संपूर्ण जगाला होते. अशा शोमुळे स्पर्धकांना एक दिशा मिळते. त्यामुळेच हे शो खूपच गाजताना दिसतात. लवकरच टीव्हीवर सर्वांचा लाडका इंडियाज गॉट टॅलेंट हा शो सुरु होत असून, सध्या त्याचे वेगवेगळे प्रोमो सोशल मीडियावर आणि टीव्हीवर सर्वांना पाहायला मिळत आहे. यातला एक प्रोमो सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून, त्यात सर्वच परीक्षक भावुक झाल्याचे दिसते.
इंडियाज गॉट टॅलेंटच्या या पर्वात शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty), बादशाह (Badshah), मनोज मुंतशीर आणि किरण खेर (Kirron Kher) परीक्षक म्हणून दिसणार असून, अर्जुन बिजलानी सूत्रसंचालक असणार आहे. मागील अनेक दिवसांपासून हा शो बज तयार करत असून, तर या शोच्या प्रोमोनी सर्वच प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे.
देशाच्या कानाकोपऱ्यातून या शोच्या स्टेजवर वेगवेगळ्या प्रतिभा असणारे स्पर्धक सर्वांना पाहायला मिळणार आहे. यातच या शोचा एक असा प्रोमो समोर आला असून, जो पाहून जज आणि प्रेक्षक देखील भावुक झाले. या प्रोमोमध्ये एक स्पर्धक असलेली इशिता विश्वकर्मा नावाची मुलगी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे ‘तू जहां जहां चलेगा’ हे गाणे गाते. तिचे गाणे ऐकून परीक्षकांपासून अर्जुनपर्यंत सर्वांनाच भरून आले. बादशहा आणि किरण खेर त्यांचे अश्रू लपवूच शकले नाही, आणि गाणे ऐकतानाच रडू लागले. बादशहाला असे रडताना पाहून शिल्पा आणि किरण खेर यांनी त्याला शांत केले.
त्यानंतर शिल्पा शेट्टी स्टेजवर जाते नाही इशिताचे कौतुक करत तिला मिठी मारते. इशिताची आईदेखील तिचे गाणे ऐकून रडू लागते. शिल्पा नेहमीच इंडियाज गॉट टॅलेंटच्या सेट्वरुन विविध फनी व्हिडिओ शेअर करताना दिसते. येत्या जानेवारीपासून हा शो सुरु होणार आहे.
हेही वाचा :