Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ हिंदीत पाहण्यासाठी पाहावी लागेल वाट, रिलीझची डेट लांबणीवर

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा : द राइज’ हिंदीत पाहण्यासाठी पाहावी लागेल वाट, रिलीझची डेट लांबणीवर

अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना अभिनित ‘पुष्पा: द राइज’चा उत्साह आजकाल सोशल मीडियावर जोरदार दिसत आहे. या चित्रपटाची हिंदी वर्जन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. परंतु लाखो प्रेक्षक तो ऑनलाइन पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. जर तुम्ही देखील या दर्शकांपैकी एक असाल, तर तुम्हाला या चित्रपटाचे हिंदी डब वर्जन पाहण्यासाठी आणखी एक आठवडा प्रतीक्षा करावी लागेल. ‘पुष्पा’ ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २०२१ सालचा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. अल्लूची ही लोकप्रियता पाहता आता या चित्रपटाच्या हिंदी वर्जनच्या ओटीटी प्रदर्शनाची तारीख पूर्ण आठवडा वाढवण्यात आली आहे.

अल्लू (Allu Arjun) आणि रश्मिका (Rashmika Mandanna) यांची लोकप्रियता लक्षात घेता, हिंदी मार्केटमध्ये कोणत्याही प्रादेशिक भाषेतील चित्रपटाचा हा सर्वात मोठा पदार्पण आहे. हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे हिंदी वर्जन १४ जानेवारी २०२२ रोजी अमेझॉन प्राईमवर प्रसारित होणार होता. मात्र आता तो १ आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे.

ऍक्शन असो, ड्रामा, डान्स किंवा कॉमेडी असो, अल्लू हा टॅलेंटचा एक बॉक्स आहे. ब्लॉकबस्टर हिट ‘पुष्पा: द राइज’मध्येही त्याची जादू प्रेक्षकांच्या मनात डोकावत आहे. पुष्पाची स्टाईल सोशल मीडियावर गाजत आहे. हा चित्रपट देशभरातील बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करत आहे. मुख्य भूमिकेत अल्लू त्याच्या दमदार डायलॉग आणि डान्स मूव्ह्जने प्रेक्षकांना वेड लावत आहे. ज्यामुळे निर्मात्यांना अमेझॉन प्राइम व्हिडिओवर हिंदी डब केलेले वर्जन प्रदर्शित करण्यास भाग पाडले आहे.

मूळ तेलुगूमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये डब वर्जन आहेत. १७ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या हिंदी वर्जनने ८० कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, जर आपण वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोललो, तर आतापर्यंत ३०० कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे.

‘पुष्पा’ हा एक मोठा बजेट चित्रपट असून, त्याची किंमत २५० कोटी आहे आणि त्याची निर्मिती मायथ्री मूव्ही मेकर्स आणि मटमसेट्टी मीडिया यांनी केली आहे. या चित्रपटात समंथा रुथ प्रभू देखील आहे. जी अल्लू अर्जुनसोबत आयटम गर्ल म्हणून डान्स करताना दिसत आहे. ‘पुष्पा: द राइज पार्ट १’ जबरदस्त ट्रेंड करत आहे आणि आता त्याच्या स्टार कास्टच्या अभिनयाची बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी प्रशंसा केली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा