Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘रणबीर कपूर म्हणत असेल, धन्यवाद देवा ब्रेकअप केला’, ‘गेहेराईयाचा’ ट्रेलर पाहून केआरकेने उडवली दीपिकाची खिल्ली

दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट ‘गेहेराईया’ चर्चेत आहे. याच ‘गेहेराईया’ या चित्रपटावर केआरकेने कमेंट केली आहे. केआरके आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असतो. आताही त्याने दीपिकाच्या सिनेमाबद्दल ट्विट करताना रणवीर सिंगचही नावं घेतलं आहे.

दीपिकाचा (deepika padukone) आगामी चित्रपट ‘गेहेराईया’ अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होत आहे. त्या सिनेमाची चर्चा फार रंगली आहे. या सिनेमात अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. हा सिनेमा ट्रेलर प्रेक्षकांना पसंतीस येत आहे. परंतु नेहमीच वादग्रस्त विधान करणाऱ्या कमाल खान उर्फ केआरकेने दीपिकाची खिल्ली उडवली आहे.

केआरकेने रणवीर सिंगची खिल्ली उडवली. तो म्हणाला की, “रणबीर कपूरने ‘गेहेराईया’चा ट्रेलर बघितल्यानंतर तो स्वतःशीच म्हणाला असेल की, “धन्यवाद देवा! दिपू आणि माझ्यात ब्रेकअप केलास! नाही तर आज बाजारात माझी पण इज्जत गेली असती!” याच्या आधी त्यांनी ट्विट केले होते की, “माफ करा मला ‘गेहेराइया’ सिनेमा पाहता आला नाही आणि त्यावर टिप्पणी करता आली नाही. पण हे लोग कधी सुधारणार नाहीत.”

रणवीर सिंगने ‘गेहेराईया’ या सिनेमाचा ट्रेलर बघून दीपिकाची खूप प्रशंसा केली आहे. तो म्हणाला की, “दीपिका मुडी, सेक्सी आणि इंटेन्स आहे. सिनेमा फार सुंदर झाला आहे आणि या सिनेमात माझ्या सगळे आवडीचे कलाकार आहेत. अनन्या पांडे, सुकुन बत्रा, सिद्धांत चतुर्वेदी, नासिर साहब आणि दिपू आहे.” यातून त्याने दीपिकाचे कौतुक केले होते.

दीपिका पदुकोणचा ‘गेहेराइया’ हा सिनेमा ११ फेब्रुवारीला ॲमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाची चर्चा सर्वत्र रंगत आहे. हा सिनेमा भारताबरोबरच २४० देशात प्रदर्शित होईल. हा सिनेमा करण जोहरने प्रोड्युस केला असून त्याचं दिग्दर्शन शकुन बद्राने केल आहे. दीपिका पदुकोणने याआधी ‘८३’ या सिनेमात रणवीर सिंगबरोबर दिसून आली होती. दीपिकाला येणाऱ्या आपल्या आगामी सिनेमाची फार उत्सुकता लागली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा