Monday, January 26, 2026
Home अन्य मोठी बातमी! प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का

मोठी बातमी! प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याची आत्महत्या, चाहत्यांना मोठा धक्का

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तव याने आत्महत्या केल्याचे वृत्त समोर येत आहे. त्याच्या निधनाच्या वार्तेमुळे त्याचे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

चंद्रशेखर हा एक उत्तम अभिनेता होता, तसेच तो मॉडेल म्हणूनही परिचित होता. चंद्रशेखरने वेब सीरीज वल्लमई थारायोमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारली होती.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रशेखर श्रीवास्तव बुधवारी त्याच्या घरीच होता. त्यानंतर त्याचा मृतदेह घरात लटकलेला आढळला आहे. ही आत्महत्या असावी असा अंदाज वर्तवला जात आहे

Chandrasekhar Srivastava
Chandrasekhar Srivastava

अभिनेता चंद्रशेखर श्रीवास्तव याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, चंद्रशेखर हा गेल्या काही महिन्यांपासून मानसिक त्रासातून जात असल्याचे बोलले जात आहे. चंद्रशेखर या अनपेक्षित मृत्यूने त्याचे चाहते हळहळले आहेत

यापूर्वी देखील दक्षिणात्य अभिनेता सुशील गौडाने आत्महत्या केली होती. या अभिनेत्याने 2020 मध्ये जगाला निरोप दिला होता

हे देखील वाचा